शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम अपहार तीन वर्षांपासून

By admin | Updated: September 24, 2015 00:03 IST

शेवाळे यांची माहिती : साडेतेरा लाखांसह आठ गाड्या जप्त

कणकवली : एटीएम अपहार हा गेल्या दोन महिन्यांतील नसून, गेली तीन वर्षे सुरू असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मुख्य सूत्रधार कुणाल सावंत याने अत्यंत हुशारीने बॅँक आणि कंपनीला फसवून पैशांची फिरवाफिरवी केल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी चार कारसह आठ गाड्या जप्त केल्या असून, साडेतेरा लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांनी दिली. रेल्वेच्या कॅश काऊंटरमधील अफरातफरीतून पहिल्यांदा एटीएम अपहार उघड झाला. त्यानंतर तपासात प्रत्यक्षात ही पैशांची फिरवाफिरवी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याचे समोर आले आहे. कुणाल सावंत याने दिलेल्या माहितीवरून पोलीस चक्रावले आहेत. अत्यंत हुशारीने कुणाल सावंत याने बॅँक आणि कंपनीला फसविल्याचे दिसून आले. एटीएम मशीनच्या तंत्राची माहिती मिळाल्याने त्याच्या आधारे कुणाल सावंत याने हव्या तशा बिल्स प्रिंट करून पैशांची फिरवाफिरवी केली. बॅँकेला दाखविण्यासाठी आणि सीएमएस कंपनीला दाखविण्यासाठीच्या वेगळ्या अशा बिल्स कुणाल सावंत मशीनमधून काढत असे. पैसे डिपॉझिट करण्याचा कालावधी वाढवून मधल्या काळात तो पैशांची फिरवाफिरवी करीत असे. मात्र, नेमके कशासाठी आणि कसे पैसे वापरले त्याचा अद्याप स्पष्टपणे खुलासा झालेला नाही. पोलिसांनी ९४ लाख ५६ हजारांपैकी आतापर्यंत साडेतेरा लाखांची रक्कम जप्त केली आहे. (प्रतिनिधी)एफआयएस मुख्य कंपनीबॅँक एटीएमसंबंधी सेवा देणारी देशस्तरावरील एफआयएस ही मुख्य कंपनी असून, त्याची सीएमएस इन्फोसिस्टीमस् ही उपकंपनी आहे, जी फक्त एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्याचे काम करते.दोघे उच्च शिक्षित अक्षय सावंत आणि संतोष पाटोळे हे दोन्ही उच्चशिक्षित आहेत. अक्षय सावंत हा मरीन इंजिनिअर असून, पोर्ट ट्रस्टची कामे करतो, तर संतोष पाटोळे हा एमबीए आहे. अक्षय सावंत हा कुणाल सावंत याचा चुलत भाऊ असून, कुणाल याने अक्षय याच्या आईच्या खात्यावर तीन वर्षांपूर्वी चार लाख रुपये जमा केले होते.