शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणूक : विक्रमी मतदानाची अपेक्षा

By admin | Updated: October 14, 2014 23:22 IST

रत्नागिरीत अडीच लाख मतदार.

रत्नागिरी: राष्ट्रवादीच्या गेल्या पंधरा दिवसांमध्ये राजकीय पक्षांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून काढल्यानंतर आता सर्वच उमेदवारांच्या परीक्षेची वेळ आली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २ लाख ६५ हजार २७९ एवढे मतदार असून, उद्या (दि. १५) मतदानाच्या निमित्ताने होणाऱ्या उमेदवारांच्या परीक्षेचा निकाल येत्या १९ आॅक्टोबरला लागणार आहे. प्रत्यक्षात ११ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी चार प्रमुख पक्षात ही निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत विक्रमी मतदानासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. मतदारसंघात एकूण १६६७ मतदान केंद्र असून, सर्वत्र निवडणूक अत्यंत शांततेत व्हावी, कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घेतली आहे. तसेच या मतदारसंघात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे आठ गट तसेच संगमेश्वर तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील एक जिल्हा परिषद गट अशा एकूण ९ गटांचा या मतदारसंघात समावेश आहे. रत्नागिरी मतदारसंघ या निवडणुकीत संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरला आहे. या मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक ११ उमेदवार रत्नागिरी विधानसभा मतदार संघातच उभे आहेत.निवडणुकीच्या मतदानासाठी १३ व १४ आॅक्टोबरला मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. रत्नागिरीजवळच असलेल्या कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथे मतदान यंत्र कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आली असून निवडणूक अधिकारी व कर्मचारी एस. टी. बसेसमधून मतदारसंघातील मतदान केंद्रात पोहोचले आहेत. सकाळच्या सत्रात डॉ. आंबेडकर न्याय भवनात कर्मचाऱ्यांची जोरदार धावपळ सुरू होती.रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील ३४१ मतदान केंद्रातील ३४ विभागाकरिता राखीवसह ३८ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे तर ३७५ मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्र अधिकारी वर्ग १ ते ३साठी ११२५ कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी ३७५ कर्मचारी असे एकूण १९१३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून उर्वरित टीम मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर सायंकाळपर्यंत तपासणी केलेली मतदान यंत्रे यांच्यासह बुधवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी रवाना झाली आहे. बुधवारी प्रथम मतदान यंत्रांची चाचणी घेऊन मगच मतदानाला सुरूवात केली जाणार आहे. (प्रतिनिधी)नावपक्षउदय सामंतशिवसेना--रमेश कीरकाँग्रेस--दिनेश पवारबसपा--बशीर मुर्तुझाराष्ट्रवादी--सुरेंद्र तथा बाळ मानेभाजप--प्रवीण जाधवबहुजन मु. पार्टी--उदय सामंतशिवसेना -मनिष तळेकरअपक्ष--नंदकुमार मोहितेअपक्ष--सुनील सुर्वेअपक्ष--संदीप गावडेअपक्षमतदारसंघात एकूण १६६७ मतदान केंद्र.रत्नागिरीतील आठ गट व संगमेश्वरातील एक जिल्हा परिषद गट अशा एकूण नऊ गटांचा मतदारसंघात समावेश.मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकारी व कर्मचारी दाखल.उमेदवार 11  --मतदान केंद्र  1667दापोली मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्णदापोली  एकूण मतदार २,६३,८८१ नाव पक्ष सूर्यकांत दळवीशिवसेना , केदार साठेभाजप , शशिकांत धाडवेस्वाभिमान ब. संघआदम चौगुलेबहुजन मु. मोर्चा ,वैभव खेडेकरमनसे ,संजय कदमराष्ट्रवादी ;;अ‍ॅड. सुजित झिमणकाँग्रेस ,,किशोर देसाईअपक्षदयानंद कांबळेबसपा ,,प्रदीप गंगावणेअपक्षदहा उमेदवारांचे भवितव्य आज यंत्रबंद --सावंतवाडी मतदारसंघ : महाराष्ट्रभरात चर्चेला ठरलेली निवडणूकनावपक्षबाळा गावडेकाँग्रेस --दीपक केसरकरसेना --राजन तेली भाजप --सुरेश दळवी राष्ट्रवादी कॉँग्रेस  --परशुराम उपरकरमनसेकिशोर लोंढे अपक्ष --अजिंक्य गावडेअपक्ष --उदय पास्तेअपक्षकणकवलीत सुरक्षा यंत्रणा सज्जनावपक्षप्रमोद जठारभाजपा --नितेश राणेकाँग्रेस -सुभाष मयेकर शिवसेना --अतुल रावराणे राष्ट्रवादी कॉँग्रेस  --डॉ. तुळशीराम रावराणेशेकाप - चंद्रकांत जाधव बसपा --विजय कृष्णाजी सावंतअपक्ष -विजय श्रीधर सावंतअपक्षकणकवली एकूण मतदार २,२३, ९१०सव्वादोन लाख मतदार ठरवणार आमदारगुहागर मतदारसंघ : सीआरएफच्या जवानांचाही कडेकोट बंदोबस्तनाव पक्षभास्कर जाधवराष्ट्रवादी --डॉ. विनय नातूभाजप --संदीप सावंतकाँग्रेस --सुरेश गमरेबसपा --विजयकुमार भोसलेशिवसेनाकुडाळ मतदारसंघात प्रशासन सज्जनाव पक्षनारायण राणेकाँग्रेस --वैभव नाईकसेना -पुष्पसेन सावंत राष्ट्रवादी -विष्णू मोंडकर भाजपा