शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना पक्ष बांधणीसाठी विधानसभा मतदार संघ निहाय २७ एप्रिलला बैठका, कणकवलीतील कार्यालयाचे उदघाटन होणार

By सुधीर राणे | Updated: April 24, 2023 15:41 IST

कणकवली: शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका २७ एप्रिलला होणार आहेत. या बैठकीला ...

कणकवली: शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका २७ एप्रिलला होणार आहेत. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, उद्योजक किरण सामंत उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी दिली.कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, जिल्हा खजिनदार भास्कर राणे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, शहरप्रमुख बाळू पारकर आदी उपस्थित होते.संजय आग्रे म्हणाले, २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजण्याच्या कालावधीत  सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक होणार आहे. दुपारी १२:३०  ते १:३० च्या दरम्यान कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. दुपारी अडीच ते साडेचार दरम्यान ओरोस येथे जिल्हाधिकाऱ्यांसह विकासकामे आढावा बैठक होईल. तसेच सायंकाळी ५ वाजता कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी ६ वाजता शिवसेना कणकवली तालुक्याच्यावतीने जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे पारितोषिक वितरण करण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी यावेळी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना