दोडामार्ग : बेधुंद वातावरणात घुमणारं डीजेचे संगीत, अंगाला बोचणारी गुलाबी थंडी, आकर्षक रंगीबेरंगी स्टेज व प्रेक्षकांत सळसळणारा उत्साह आणि मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या जोरावर ‘मिस दीपावली’साठी थिरकलेल्या अनेक सुंदर युवतींपैकी रायगडच्या अस्मिता सुर्वेने काँटे की टक्करची लढत देत अखेर ‘मिस दीपावली दोडामार्ग २०१५’ चा किताब पटकावला. तर ‘मिस्टर हँण्डसम दोडामार्ग’चा मानकरी रत्नागिरीतील शुभम रसाळ ठरला. दीपावली शोटाईम अंतर्गत आयोजित केलेल्या या खास स्पर्धेसोबतच फॅन्सी ड्रेस, रेकॉर्ड डान्स स्पर्धा प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणीच ठरल्या.‘मिस दीपावली दोडामार्ग’ स्पर्धेत वेंगुर्ले येथील नम्रता सावंत व्दितीय व सावंतवाडीची प्रार्थना मोंडकर तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. तर ‘मिस्टर हँण्डसम दोडामार्ग’ मध्ये गोकुळदास बोंद्रे (दोडामार्ग) व आकाश तेलगू (मडगाव) यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक मिळवला. याप्रसंगी दोडामार्ग उत्कर्ष समिती अध्यक्ष विवेकानंद नाईक, शिवसेना तालुकाध्यक्ष बाबुराव धुरी, नगरसेवक चेतन चव्हाण, सुधीर पानवलकर, रामचंद्र ठाकूर, संध्या प्रसादी, संतोष म्हावळणकर, माजी सरपंच राजेश प्रसादी, उद्योजक शैलेश भोसले मंडळाचे अध्यक्ष मनोज पार्सेकर, सुदेश मळीक, प्रकाश सावंत, अमर सडेकर, पिंकी कवठणकर, ओंकार पेडणेकर, रोहन चव्हाण, अर्जुन सावंत, विशाल चव्हाण, राजेश फुलारी, नारायण दळवी, नुपूर फुलारी आदी उपस्थित होते. कॅटवॉकनंतर यूवर चॉईस राऊंड अंतर्गत परिचय करून दिलेल्या युवतींचे लुक्स तसेच ‘पोझेस’ बघण्यासारख्या होत्या. शेवटच्या ट्रॅडिशनल राऊंडसाठी पारंपरिक वेशभूषा करून रॅम्पवर उतरलेल्या युवतींना ‘जनरल नॉलेज’च्या कठीण व सोप्या प्रश्नांनाही सामोरे जावे लागले. त्यात बहुतांशी युवतींची अक्षरश: तारांबळ उडाली. एकूण १७ युवतींपैकी अस्मिता सुर्वे, नम्रता सावंत व प्रार्थना मातोंडकर या तिघींनी प्रश्नोत्तरांचा काहीसा समतोल साधत अखेर आपली नौका तारली. मिस दीपावली दोडामार्गची मानकरी ठरलेल्या रायगडच्या अस्मिता सुर्वे हिला दोडामार्गमधील अनुजा काळोकर यांनी रत्नजडीत स्वरूपातील मिस दीपावली दोडामार्गचा मुकूट चढवला. तिला १०,०००रूपये, मानाचा मुकूट व मोबाईल हॅडण्सेट, घड्याळ आणि ड्रेस देऊन गौरविण्यात आले. या व्यतिरिक्त उक्तृष्ट केशरचना श्वेता सुिद्रक (कणकवली), उत्कृष्ट डान्स भक्ती जामसंडेकर (सावंतवाडी), वेशभूषा सिध्दी शेटये (म्हापसा), स्माईल समीक्षा गावकर (डिचोली) व उत्कृष्ट कॅटवॉक अजया वाळके (साखळी) यांनागौरविण्यात आले.या व्यतिरिक्त उत्कृष्ट स्माईल विरेंन्द्र नाईक (डिचोली), वेशभूषा कमलेश ठाकूर (सावंतवाडी), उत्कृष्ट बॉडी सिध्देश शेटये (दोडामार्ग), उत्कृष्ट डान्स प्रतीक वाडकर (साखळी गोवा) यांना प्रत्येकी ५०० रूपये व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अजय देसाई, संदीप गवस, रश्मी फुलारी, चेतन चव्हाण व निलोफर शेख यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
अस्मिता मिस दोडामार्ग, मिस्टर हॅण्डसम शुभम रसाळ
By admin | Updated: November 23, 2015 00:30 IST