शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठ उपकेंद्रात दोन महिन्यात संचालकाची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 13:38 IST

कोकण विद्यापीठाच्या स्थापनेबाबत अभ्यास गटाकडून अभ्यास केला जात असून, पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांचे मत घेण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या उपकेंद्रांमध्ये दोन महिन्यांत संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

ठळक मुद्देमुंबई विद्यापीठ उपकेंद्रात दोन महिन्यात संचालकाची नियुक्तीनिरंजन डावखरेंच्या लक्षवेधी सुचनेवर सरकारची माहिती

सिंधुदुर्ग : कोकण विद्यापीठाच्या स्थापनेबाबत अभ्यास गटाकडून अभ्यास केला जात असून, पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांचे मत घेण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या उपकेंद्रांमध्ये दोन महिन्यांत संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सुचना मांडली होती. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर भौगोलिक अंतरामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना मुंबईत येण्यास अडचणी येतात.

सुमारे ८ लाख विद्यार्थ्यांना सेवा देण्यास मुंबई विद्यापीठ अकार्यक्षम ठरत आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी लक्षवेधी सुचनेद्वारे आमदार डावखरे यांनी केली. कोकण विद्यापीठाच्या स्थापनेबाबत वर्तमानपत्रातही बातमी प्रसिद्ध झाल्या होत्या, त्याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचा कारभार सुस्थितीत चालण्यासाठी संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणीही आमदार डावखरे यांनी केली.त्यावेळी उच्च-तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, ैैस्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून अभ्यास सुरू आहे. तर पुढील काळात स्वतंत्र विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांच्याही भूमिका जाणून घेण्यात येतील. कोकण विद्यापीठाबाबत शासनाचा निर्णय जाहीर होईल. अभ्यास गटाचा निर्णय येईपर्यंत येत्या दोन महिन्यांत विद्यापीठाच्या उपकेंद्रांमध्ये संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल.''

राज्य सरकारची भूमिका दुटप्पी : निरंजन डावखरेकोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ जाहीर करण्याचे वृत्त जानेवारीमध्ये वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, आता राज्य सरकारकडून कोकण विद्यापीठाबाबत दुटप्पी भूमिका घेतली जात आहे, असा आरोप आमदार निरंजन डावखरे यांनी केला. 

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठsindhudurgसिंधुदुर्ग