शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी नगरपालिकेवर प्रशासकाची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 17:07 IST

कोरोनाच्या काळात निवडणुका पुढे ढकलल्यामुळे आज मंगळवार पासून मालवण, वेंगुर्ला नगरपालिकेवर तर उद्या, बुधवार पासून सावंतवाडी नगरपालिकेवर प्रशासक नेमण्यात आले आहेत.

सावंतवाडी : कोरोनाच्या काळात निवडणुका पुढे ढकलल्यामुळे आज मंगळवार पासून मालवण, वेंगुर्ला नगरपालिकेवर तर उद्या, बुधवार पासून सावंतवाडी नगरपालिकेवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यासाठी नगरविकास खात्याकडून प्रांताधिकार्‍यांना पदाचा कार्यभार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे परिपत्रक प्रत्येक नगरपालिकेला देण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाल पालिका प्रशासन प्रशासक हाती जाणार असून निवडणूक होईपर्यंत हा कार्यभार घेणार आहेत.सावंतवाडीत तर नगरपालिकेतील नगराध्यक्ष व नगरसेवक याची मुदत ही १६ डिसेंबर ला संपत होती. मात्र आणखी दहा दिवस कालावधी वाढवून मिळेल अशी आशा विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवक यांना होती. पण फक्त चार दिवस वाढले असून मंगळवारी सावंतवाडीतील नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा कार्यभार समाप्त झाला आहे. उद्यापासून सावंतवाडीचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर हे प्रशासक म्हणून आपण कार्यभार स्वीकारणार आहेत.सावंतवाडी पालिकेसह मालवण वेंगुर्ला नगर परिषदांची मुदत संपली आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नगरविकास विभागाकडून सोमवारी रात्री उशिरा हे परिपत्रक काढण्यात आले असून ते प्रथम जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी त्याची तत्काळ अंमलबजावणी केली असून तसे आदेश सावंतवाडी वेंगुर्ले मालवण नगरपालिकांना ही काढले आहेत. त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.कोविड-१९ च्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणुकांकरिता निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याने व मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने मुदत समाप्तीनंतर नागरी स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्ती करण्यात येत असते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी