शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

गणेशोत्सवासाठी सतर्कतेचे आवाहन

By admin | Updated: August 24, 2014 22:34 IST

मालवणात बैठक : शासनाच्या सर्व विभागांना सूचना

मालवण : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सण साजरा करताना नागरिकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. शहरात वीज, दूरध्वनी व वाहतुकीची समस्या गंभीर आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव काळात सतर्क राहून सहकार्य करावे, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत नागरिकांकडून करण्यात आले.मालवण येथील पोलीस वसाहतीनजिक बहुउद्देशीय सभागृहात मालवण पोलीस स्थानकाच्यावतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले, नायब तहसीलदार आंगणे, एसटी स्थानकप्रमुख राजन भोसले, माजी नगराध्यक्षा सुरेखा सरमळकर, नगरसेवक दीपक पाटकर, कांदळगाव पोलीस पाटील शितल परब, सागररक्षक दलाचे नारायण हडकर, आनंद मालंडकर, राजकुमार शेडगे, विजय कांबळी, घुमडे पोलीस पाटील प्रशांत बिरमोळे, विनायक प्रभू, आनंद देऊलकर, व्यापारी संघाचे उमेश नेरूरकर, विजय केनवडेकर, नितीन तायशेटे, वासुदेव गावकर, पांडुरंग चव्हाण आदी उपस्थित होते.विजय केनवडेकर म्हणाले, गणेशोत्सव काळात मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहक गर्दी करतात. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना वाहनांच्या पार्कींगसाठी बाजारपेठेत पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने ग्राहकांना रस्त्याच्या कडेला वाहन उभे करावे लागते. मागील वर्षी याच कारणावरून पोलीस आणि ग्राहकांमध्ये वादाच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनी ग्राहकांच्या गैरसोयीचा विचार करून कडक कारवाई करण्याचे टाळावे. वाहनांच्या पार्कींगसंदर्भात त्यांना सूचना करण्यात येतील, असेही केनवडेकर म्हणाले.मालवण शहरात आणि ग्रामीण भागात विजेची नेहमीच समस्या नागरिकांना भेडसावत असते. वीज वितरण कंपनीने गणेशोत्सवापूर्वी सतर्कता बाळगून नागरिकांच्या समस्या दूर कराव्यात, अशा सूचना करण्यात आल्या. यावर वीज वितरणचे अभियंता वावरे यांनी गणेशोत्सव काळात मालवण शहर, पेंडूर, चौके, मालवण देऊळवाडा येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे शांतता समितीच्या बैठकीत सांगितले. (प्रतिनिधी)