शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

सी वर्ल्डबाबतची भूमिका जाहीर करा

By admin | Updated: July 28, 2015 21:39 IST

मंदार केणी : शिवसेनेला आवाहन

मालवण : केंद्र व राज्यात भाजप-सेना सरकार अपयशी ठरले आहे. वाळूप्रश्न, सी-वर्ल्ड, पारंपरिक मच्छिमारांचे प्रश्न सोडवतो असे सांगून जनतेची फसवणूक केली आहे. स्थानिक आमदार सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत जाहीर भूमिका घेत नाहीत. सी -वर्ल्ड प्रकल्प रद्द करू असे म्हणणारे आमदार आरसे महालात लपून बसतात, अशी टीका काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर केली. तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान केला आहे. तालुक्यात शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची वेगळी फळी निर्माण करून नारायण राणे व जनतेला अभिप्रेत असे काम करून दाखवेन, असा विश्वास केणी यांनी व्यक्त केला. भरड येथील नारायण राणे संपर्क कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, खरेदी विक्री संघाचे चेअरमन आबा हडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, नगराध्यक्ष अशोक तोडणकर, राजन गावकर, अनिल कांदळकर, उमेश मांजरेकर, राजू परुळेकर, संजय लुडबे, संग्राम प्रभुगावकर, राजेंद्र प्रभुदेसाई, छोटू ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)पारंपरिक मच्छिमारांच्या मागे काँग्रेस पक्ष पारंपरिक मच्छिमारांच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. निवडणूक काळात पारंपरिक मच्छिमार आणि पर्सनेट मच्छिमार वादावर तोडगा काढू असे आश्वासन देऊन मते मागितली होती. पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने शिवसेना नसल्यानेच पारंपरिक मच्छिमारांना अटक झाली. पर्सनेट व्यावसायिकांची बाजू पालकमंत्री दीपक केसरकर उचलून धरतात, तर आपण पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने असल्याचे बेगडी प्रेम आमदार वैभव नाईक दाखवत असल्याचा आरोप केणी यांनी केला. मच्छिमारांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठाम उभा राहील. त्यांना लागणारे आर्थिक साहाय्य देण्याबरोबर त्यांच्या पर्ससीनविरोधी लढ्यात आमचे पदाधिकारी सहकार्य करतील. तसेच पर्सनेटला काँग्रेसचा विरोध नाही. अनधिकृत मासेमारी व परप्रांतीय ट्रोलर मासेमारीस आमचा विरोध राहील, अशी भूमिका केणी यांनी मांडली. वाळूप्रश्नी आवाज उठविणारतालुक्यात सध्या वाळू प्रश्न हा वाळू व्यावसायिकांच्या जिवावर बेतला आहे. वाळू व्यावसायिकांना जाचक अटी लावून व्यावसायिकांसह जनतेस वेठीस धरण्याचे काम आताचे आमदार, पालकमंत्री करत आहेत. आमदारांनी प्रशासनासमोर डंपरमध्ये वाळू भरून आंदोलन केले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, वाळू व्यावसायिकांना पाचपट दंड आकारण्यात येतो. याप्रश्नी काँग्रेस आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.