शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी

By admin | Updated: October 2, 2016 00:12 IST

जिल्हा परिषद कृषी समितीची सभा : शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे शासनाचे दुर्लक्ष

सिंधुदुर्गनगरी : कणकवली तालुक्यातील कुर्ली धरणाचे दरवाजे अचानक उघडल्याने लगतच्या परिसरात पाण्याचा लोट जावून झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने अद्याप कृषी विभागाला दिलेले नाहीत. त्यामुळे या घटनेबाबत शासन व प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप समिती सदस्य मधुसूदन बांदिवडेकर यांनी करून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषद कृषी समितीची मासिक सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती एकनाथ नाडकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी सदस्य रणजित देसाई, मधुसूदन बांदिवडेकर, रेश्मा जोशी, प्रमोद सावंत, समिती सचिव तथा जिल्हा कृषी विकास अधिकारी एस. एन. म्हेत्रे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या धुवाँधार पावसामुळे कुर्ली धरण तुडुंब भरले. त्यामुळे त्या धरणाचे तीन दरवाजे तेथील स्थानिक नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता उघडण्यात आले होते. त्यामुळे शिवगंगा पुलावरून सुमारे १३ फूट पाणी वाहत होते. त्यामुळे लगतच असणाऱ्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना कृषी विभागाकडून या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. शासनस्तरावरून ते पंचनामे होण्याचे आदेश अपेक्षित होते. शासनाला शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत गांभिर्य नसल्याचे सांगून सदस्य मधुसुदन बांदिवडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. पंचनामे करण्याचे आदेश शासनस्तरावरून निर्गमित व्हावेत असा एकमुखी ठराव यावेळी घेण्यात आला. भातशेतीवर करपा रोगाची तर सुपारीवर कोळा रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे याबाबतचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी या सभेत कृषी समितीचे सभापती एकनाथ नाडकर्णी यांनी केली. (प्रतिनिधी) गोडाऊन जबरदस्तीने रिकामे करु सावंतवाडी पंचायत समितीच्या कृषी विभागाने काही वर्षांपूर्वी खरेदी केलेले ५ अश्वशक्तीच्या ६७ पंपांपैकी ३७ पंप पंचायत समितीच्या गोडाऊनमध्ये पडून आहेत. हे पंप बाजूला करून गोडाऊन रिकामे करण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून केली जात आहे. असे असले तरीही जिल्हा कृषी कार्यालयामार्फत याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे याबाबतचे पत्र आयुक्तांना पाठवावे व हे गोडाऊन रिकामे करावे, अन्यथा ते जबरदस्तीने रिकामे केले जाईल, असा इशारा बांदिवडेकर यांनी यावेळी दिला. बायोगॅससाठी ९० लाख प्राप्त सिंधुदुर्गातील बायोगॅस उद्दीष्टपूर्तीसाठी शासनाकडून ८९ लाख ६९ हजार ६७५ रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पशुपक्षी मेळाव्यात तांदुळ महोत्सवाबरोबरच अन्य स्थानिक उत्पादनेही ठेवली जाणार आहेत.