शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

पाऊले चालती आंगणेवाडीची वाट

By admin | Updated: February 7, 2015 00:06 IST

प्रशासन सज्ज : आजपासून भराडीदेवीचा यात्रोत्सव; मुंबईसह राज्यातील भाविक दाखल

चौके : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील भराडीदेवीचा यात्रोत्सव उद्या (शनिवार)पासून सुरू होत आहे. कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून गणल्या जाणाऱ्या या यात्रोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक दाखल होण्यास सुरुवात झाली असून, ‘पाऊले चालती... आंगणेवाडीची वाट.. अशीच स्थिती आहे. दरम्यान, यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, पंचायत समिती, आंगणे कुटुंबीय यांनी सुयोग्य नियोजन केले आहे. यावर्षी आकर्षक विद्युतरोषणाई व फुलांची मोहक आरास भाविकांचे आकर्षण ठरणार आहे. यावेळी गर्दीचा नवा विक्रम होण्याची शक्यता आंगणेवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.चोख पोलीस बंदोबस्तजिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात आणि गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ४८ अधिकारी व ६२५ पोलीस कर्मचारी आंगणेवाडीत बंदोबस्त बजावणार आहेत. मंदिर परिसरातील रांग व्यवस्था, पेट्रोलिंग, वाहतूक नियंत्रण, वॉच टॉवर अशा माध्यमातून कर्मचारी मेहनत घेणार आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांपैकी २२५ कर्मचारी रत्नागिरी, रायगड येथून दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी) पहाटे तीन वाजल्यापासून दर्शनउद्या (शनिवार) पहाटे तीन वाजता दर्शनाला सुरुवात होईल. ते रात्री दहा वाजेपर्यंत दर्शन रांगा असणार आहेत. त्यानंतर १0 ते १२ या वेळेत महाप्रसाद आणि ताटे लावण्याचा कार्यक्रम असेल. पुन्हा रात्री १२ नंतर रविवारी सायंकाळपर्यंत दर्शन भाविकांसाठी खुले राहणार आहे. शिस्त व संयमाने दर्शन घेऊन यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्याचे आवाहन ग्रामस्थ मंडळाच्यावतीने नरेश आंगणे यांनी केले आहे. सात रांगेत दर्शनआंगणेवाडी यात्रोत्सवाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सुमारे १५ लाख भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन दर्शनासाठी सात रांगा तयार करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या भाविकांना त्वरित दर्शन मिळण्यासाठी नियोजन केले आहे.हेलीपॅडची व्यवस्थादरवर्षीप्रमाणे यावर्षीही भराडी देवीच्या दर्शनासाठी व्हीआयपींची गर्दी लक्षात घेऊन दोन हेलीपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे. महनीय व्यक्तींचे जिल्हा प्रशासन आणि आंगणेवाडी कुटुंबीयांच्यावतीने स्वागत करण्यात येणार आहे.