शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

अंगणवाडी मदतनीसने दिली शाळा जाळून टाकण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:43 IST

मालवण : वायरी येथील अंगणवाडीत मदतनीस असणा?्या वैशाली लुडबे यांनी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा जाळून टाकण्याची धमकी दिल्याने पालकांनी ...

ठळक मुद्देवायरी अंगणवाडी-शाळेच्या पालकांनी केला आरोप पालकांनी घेतला आक्रमक पवित्रा : अखेर मदतनीसवर कारवाई

मालवण : वायरी येथील अंगणवाडीत मदतनीस असणा?्या वैशाली लुडबे यांनी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा जाळून टाकण्याची धमकी दिल्याने पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला.मदतनीसवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत प्रशालेतील मुलांना पंचायत समिती बसवू असा इशारा दिल्यानंतर एकात्मिक बालविकास केंद्राच्या प्रकल्प अधिकारी कौमुदी रसाळ यांनी तात्काळ प्रशालेला भेट देत संबंधित मदतनीस महिलेचा कारवाई प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला असून तिला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दोन दिवसापूर्वी प्रशालेच्या मुख्याध्यापिकेविरोधात दंड थोपटणारी अंगणवाडी मदतनीस चांगलीच अडचणीत आली आहे.मालवण शहरातील वायरी शाळा नं . १ च्या आवारात अंगणवाडी आहे. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुलांचा व आपला मानसिक छळ करत असल्याचे सांगत १२ मार्च रोजी सकाळी अंगणवाडीच्या मुलांना थेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी नेले होते.

याप्रकरणाची दखल उपमुख्यकार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी घेत सत्यता पडताळली असता पालकांनी मुख्याध्यापिकेविरोधात कोणतीच तक्रार नसल्याचे स्पष्ट करत मदतनीसच अंगणवाडी व प्रशालेच्या मुलांचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला होता.

याबाबत  'त्या' मदतनीस महिलेने प्रशाला आवारात असणा?्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पालक तसेच ग्रामस्थांना मुलांना जीवे मारून शाळा पेटवून देण्याची धमकी दिल्याने पालक चांगलेच आक्रमक बनले होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा मालंडकर यांनी गटशिक्षणाधिका?्यांचे लक्ष वेधले.गेले काही महिने मदतनीस वैशाली लुडबे या मनमानी करून मुलांचा छळ करत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये भीतीचे वातावरण असून अंगणवाडी प्रशाला आवारात भरायची नाही. त्यासाठी पयार्यी व्यवस्था करा. ती पालकांना धमकी देत असल्याने शाळेत शिकत असलेल्या आमच्या मुलांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल पालकांनी गटशिक्षणाधिकारी वसंत महाले यांना विचारला. आमच्या भावनांचा कडेलोट झाला असून तात्काळ कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली.

यावेळी माजी नगरसेवक सुहास हडकर, सूर्यकांत फणसेकर, मुख्याध्यापिका मनीषा निकम, अलका गावकर, शिंदे, कृष्णा मालंडकर, बंड्या गावकर, शिवा चव्हाण, हेमंत भोजने, दर्शा शिरोडकर, आनंद गावकर, किशोर गावकर, सुभाष गावकर, विनोद शिरोडकर, विजय आडेकर, धनश्री शिरोडकर, भावना गावकर, नानू गावकर, प्रज्ञा चव्हाण, आरती गावकर, सतीश गावकर, विरेश चव्हाण, अतुल हडकर आदी पालक, पालक ग्रामस्थ उपस्थित होते.मदतनीस सक्तीच्या रजेवरपालकांनी मदतनीसचा तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर एकात्मिक बालविकास केंद्राच्या वतीने तात्काळ दखल घेण्यात आली. प्रकल्प अधिकारी कौमुदी रसाळ यांनी प्रशालेला भेट देत संबंधित मदतनीस यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून कारवाई प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आला आहे. तसेच या अंगणवाडीसाठी दुस?्या मदतनीसची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी पालकांनी त्यांना निवेदन सादर करताना वैशाली लुडबे यांनी पालकांना जीवे मारण्याची व शाळा जाळून टाकण्याची धमकी दिली आहे, त्यांच्यामुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांनतर लुडबे यांची मदतनीस म्हणून वायरी अंगणवाडीसाठी नियुक्ती करण्यात येऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मुख्यसेविका स्नेहा सामंत, केंद्रप्रमुख अनिल खडपकर उपस्थित होते. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग