शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

आंबोलीत दारूचे टेम्पो पकडल

By admin | Updated: November 28, 2014 23:41 IST

ग्रामस्थ आक्रमक : ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त; चालक फरारे

आंबोली/ इन्सुली : मध्यरात्रीपासून आंबोलीतील बसस्थानक परिसरात दारूने भरलेले दोन टेम्पो उभे असल्याचा संशय ग्रामस्थांना आल्यानंतर त्यांनी याबाबतची कल्पना उत्पादन शुल्क विभागाला देऊनही त्यांनी त्यातील एक गाडी सोडली. ग्रामस्थांना ही कृती संशयास्पद वाटली. त्यानंतर उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी दोन टेम्पो पकडले आहेत. या कारवाईत टेम्पोसह ३६ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. यात २६ लाख ८८ हजार रुपयांची दारू आणि १0 लाख रुपये किमतीचे दोन टेम्पो ताब्यात घेतले. मात्र, गाडीचालक व मालक फरार झाले आहेत.आंबोली बसस्थानकावर मध्यरात्रीपासून दोन टेम्पो उभे होते. या टेम्पोबाबत तेथील ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची चौकशी केली असता, गाडीत कोण नसल्याने ते तेथून निघून गेले. त्याचवेळी तेथे उत्पादन शुल्कचे अधिकारी दाखल झाले. ते यातील एक टेम्पो (एमएच १४ डीएम ५९६६) (पान ८ वर)आंबोलीतील प्रकाराची कसून चौकशी करणार : दरेकरआंबोलीत घडलेला प्रकार हा गंभीर आहे. जर ग्रामस्थांकडे याची चित्रफीत असल्यास त्यांनी द्यावी. त्याआधारे त्या अधिकाऱ्यांची व कारवाईची चौकशी करू आणि त्यानंतर पुढील कारवाई करू. घडलेला सर्व प्रकार आपण समजावून घेतल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे उत्पादन शुल्क विभागाच्या उपआयुक्त संगीता दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.