शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अमिता कावतकर मिस सुंदरवाडी

By admin | Updated: February 10, 2015 00:01 IST

सावंतवाडीत महोत्सव : देवगडच्या तन्वी चांदोस्कर सौभाग्यवती सुंदरी

सावंतवाडी : ‘सुंदरवाडी महोत्सव २०१५’ मध्ये सौंदर्यवतींच्या ‘मिस सुंदरवाडी’ या स्पर्धेत रत्नागिरीच्या अमिता कावतकर हिने विजेतेपदाचा मुकुट प्राप्त केला. तर सौभाग्यवतींकरिता घेण्यात आलेल्या ‘सौ. सुंदरवाडी’ या स्पर्धेत देवगडच्या तन्वी चांदोस्कर या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. सुंदरवाडी पर्यटन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांनी अफाट गर्दी केली होती. सायंकाळी ६ वाजता स्थानिक कलाकारांनी आॅर्केस्ट्रा सादर केला. यावेळी नवनवीन गाणी सादर करीत आॅर्केस्ट्रातील सर्व गायक, वाद्य कलाकारांनी रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळविली. सलग दोन तास कार्यक्रम सादर केलेल्या या आॅर्केस्ट्रा कलाकारांच्या कलागुणांना उपस्थितांनी दाद दिली. याच दरम्यान प्रसिध्द मराठी सिने अभिनेत्री सई ताम्हणकर यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. त्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या ‘मिस सिंधुदुर्ग’ व ‘सौभाग्यवती सुंदरवाडी’ या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. दोन्ही स्पर्धांमध्ये स्थानिकांसह महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध भागातील कलाकारांनी सहभाग घेतला. स्थानिक महिलांनी आपल्या सुंदर अशा कॅटवॉकमध्ये व्यासपीठावर येऊन सर्व प्रेक्षकांची व परीक्षकांची मने जिंकली. या सौदर्यवतींच्या अप्सरांना लाजविणाऱ्या अशा दिलखेचक अदांनी रसिक घायाळ होत होते. या सौदर्यवतींनी विविध नृत्य, वेशभूषेत विविध कार्यक्रम सादर केले. या दोन्ही स्पर्धांमध्ये चाळीस स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. ‘सौभाग्य सुंदरवाडी’ ची मानकरी देवगड येथील तत्वी चांदोसकर हिला रोख २५ हजार रुपये, द्वितीय गौरी बांदेकर (बांदा) हिला १५ हजार, तर तृतीय क्रमांक विजेती सृष्टी पेडणेकर (सावंतवाडी) हिला १० हजार रुपयांचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. तसेच बेस्ट हेअरस्टाईल मोहिनी मडगावकर, बेस्ट कॅटवॉक तन्वी चांदोसकर, बेस्ट कॉस्च्युम प्रिती सावंत (सावंतवाडी), बेस्ट स्माईल सृष्टी पेडणेकर, फोटोजेनिक कोमल राय यादव (सावंतवाडी), बेस्ट पर्सनॅलिटी तन्वी चांदोसकर, बेस्ट डान्सर मोहिनी मडगावकर यांना पारितोषिके देण्यात आली. सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे व स्मृतिचिन्ह देऊन उपस्थितांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, सनी कुडाळकर, मंदार नार्वेकर, अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, विकास सावंत, डॉ. जयेंद्र परूळेकर, संदीप कुडतरकर, सुधीर आडिवरेकर, प्रमोद सावंत, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महिला काँगे्रस तालुकाध्यक्ष गीता परब, शहराध्यक्ष स्रेहा सावंत, चित्रा भिसे, राखी कळंगुटकर, उन्नती धुरी, भारती कदम, नूतन सावंत, शिला सावंत, वैष्णवी ठोंबरे, आलिशा माठेकर, साक्षी वंजारी, बेला पिन्टो, माया चिटणीस तसेच सर्व विभागीय आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष मेहनतघेतली. (वार्ताहर)विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव‘मिस सुंदरवाडी’ स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेती अमिता कावितकर हिला २५ हजार रुपयांचे पारितोषिक उपस्थितांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक विजेती कणकवली येथील श्वेता सुद्रिक हिला १५ हजार, तृतीय विजेती मडगावच्या मर्लिन डिसिल्व्हा हिला १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच बेस्ट हेअरस्टाईल मर्लिन डिसोजा, बेस्ट कॅटवॉक अश्विनी शिवणे (रत्नागिरी), बेस्ट कॉस्च्युम अमिता कवितकर, बेस्ट स्माईल स्रेहाली सावंत (रत्नागिरी), बेस्ट डान्सर भक्ती जामसंडेकर (सावंतवाडी) यांना गौरविण्यात आले.