शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत डिसेंबरपर्यंत नियतन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 16:23 IST

शासनाकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याकरिता व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्याकरिता  २९ जुलै २०१७ अन्वये आॅक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७ करिता नियतन मंजूर झालेले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

सिंधुदुर्गनगरी  : शासनाकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याकरिता व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्याकरिता  २९ जुलै २०१७ अन्वये आॅक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७ करिता नियतन मंजूर झालेले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तालुका गोदामामध्ये शिल्लक असलेला धान्यसाठा वजा करुन उर्वरित आवश्यक नियतन पुणे यांच्याकडून उचल करुन तालुकानिहाय सुधारित इष्टांकाप्रमाणे प्रत्यक्षात कार्यरत लाभार्थीसंख्या, कार्डसंख्या, मंजूर नियतन व आपल्याकडील धान्याची मागणी यावरुन तालुका व गोदामनिहाय धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.

१ फेब्रुवारी २०१४  पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार अंत्योदय लाभार्थ्याकरिता प्रति कार्ड २५ किलो तांदूळ व १० किलो गहू व प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्याकरिता प्रति व्यक्ती ३ किलो तांदूळ व २ किलो गहू याप्रमाणे धान्य वितरित करायचे आहे. 

मंजूर नियतनानुसार प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजना लाभार्थ्याकरिता गहू व तांदुळाची उचल करुन व ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ व २ रुपये प्रति किलो दराने गहू या सुधारित दराने निश्चित केलेल्या परिमाणात वाटप होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.