शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

अक्षरसिंधु कलामंचचे बालनाट्य प्रथम

By admin | Updated: January 14, 2015 23:20 IST

राज्य बालनाट्य स्पर्धा : अंतिम फेरीत निवड

कणकवली : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य स्पर्धेत येथील अक्षरसिंधु साहित्य कलामंचच्या संघाने मुंबई विभागात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या संघाने धनंजय सरदेशपांडे लिखित ‘क्लोन’ हे बालनाट्य सादर केले होते. यामध्ये आयडियल इंग्लिश स्कूलच्या १८ बालकलाकार सहभागी झाले होते. या बालनाट्याला सांघिकसह विविध ५ पारितोषिके मिळाली आहेत.मुंबई विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या बालनाट्य स्पर्धेत ३८ संघांनी बालनाट्ये सादर केली. ही स्पर्धा मुंबई गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर येथे झाली. ‘क्लोन’ या बालनाट्याला सांघिक, दिग्दर्शन तसेच प्रकाश योजनेसाठी प्रथम, तर वेशभूषेसाठी द्वितीय व नेपथ्यासाठी विशेष पारितोषिक मिळाले आहे. या बालनाट्यातील बालकलाकार रिद्धी मोर्वेकर हिला उत्कृष्ट अभिनयाबद्दल विशेष गुणवत्ता पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक सुहास वरूणकर यांनी हे बालनाट्य दिग्दर्शित केले होते, तर संजय राणे, अमोल मोर्वेकर यांनी नेपथ्य, प्रकाश योजना ऋषिकेश कोरडे, वेशभूषा वैष्णवी मोर्वेकर, नृत्य दिग्दर्शन शेखर गवस यांनी केले होते. अमर पवार, सुप्रिया प्रभूमिराशी, प्रभाकर जाधव यांचेही सहकार्य या बालनाट्यासाठी लाभले होते. येथील कामगार कल्याण केंद्राच्या सभागृहात मंगळवारी बालनाट्य कलाकार तसेच या नाटकासाठी योगदान दिलेल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. विद्याधर तायशेटे, कामगार कल्याण केंद्राचे संचालक प्रभाकर जाधव, अक्षरसिंधु कलामंचचे संस्थापक अध्यक्ष विजय चव्हाण, अध्यक्ष प्राध्यापक हरिभाऊ भिसे, ऋषिकेश कोरडे, महानंद चव्हाण, शेखर गवस, संजय मालंडकर, अमोल मोर्वेकर, वैष्णवी मोर्वेकर यांच्यासह आयडियल इंग्लिश स्कूलचे शिक्षकवर्ग तसेच पालक उपस्थित होते. शिक्षणमंत्र्यांकडून अभिनंदनमुंबई विभागात प्रथम क्रमांक मिळविलेल्या ‘क्लोन’ या बालनाट्याची महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य राज्यस्तरीय स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या संघाचे अभिनंदन केले असल्याची माहिती प्रा. हरिभाऊ भिसे यांनी दिली.