शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्या खरातचे स्वप्नालीच्या पावलावर पाऊल!, शिक्षणासाठी झोपडीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 16:23 IST

लॉकडाऊन कालावधीत गावी आलेल्या ऐश्वर्या खरात हिला इंटरनेट सुविधा मिळत नसल्याने घरापासून एक किलोमीटरवर डोंगरामध्ये झोपडीच्या आडोशाला बसून आॅनलाईन अभ्यास करावा लागत आहे.

ठळक मुद्देऐश्वर्या खरातचे स्वप्नालीच्या पावलावर पाऊल!, शिक्षणासाठी झोपडीचा आधार कनेडीतील विद्यार्थिनीची नर्सिंग शिक्षण पूर्ण करताना धडपड

मिलिंद डोंगरेकनेडी : स्वत:ला आत्मनिर्भर, कणखर आणि शक्तिशाली बनवायचे असेल तर अभ्यासाबरोबरच महत्त्वाकांक्षा, परिश्रम आणि प्रयत्न आवश्यक आहेत. हे सिद्ध करून दाखविण्यासाठी नाटळ थोरले मोहूळ येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे बीएस्सी नर्सिंगचे शिक्षण घेणारी ऐश्वर्या रामचंद्र खरात ही युवती सज्ज झाली आहे. मात्र, लॉकडाऊन कालावधीत गावी आलेल्या ऐश्वर्या खरात हिला इंटरनेट सुविधा मिळत नसल्याने घरापासून एक किलोमीटरवर डोंगरामध्ये झोपडीच्या आडोशाला बसून आॅनलाईन अभ्यास करावा लागत आहे.दारिस्ते येथील स्वप्नाली सुतार हिच्या झोपडीतील शिक्षणाबाबत माध्यमांनी प्रकाशझोत टाकल्यानंतर अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतची यंत्रणा हलली. तिला तिच्या घरापर्यंत इंटरनेटची सुविधा पोहोचविण्यात आली. तिचे झोपडीतील शिक्षण आता घरापर्यंत पोहोचले आहे.

स्वप्नालीप्रमाणेच दुर्गम अशा नाटळ गावातील ऐश्वर्या खरात ही युवती आहे. अभ्यासात हुशार असलेल्या व भविष्यात डॉक्टर बनण्याचे स्वप्न उरी घेतलेल्या या मुलीला परिस्थितीमुळे दुधाची तहान ताकावर भागवावी लागली. परंतु याही परिस्थितीत नर्सिंग कोर्सच्या माध्यमातून तिच्याकडे गरुडझेप घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. तिचे आई-वडील शेतकरी आहेत. शिक्षणाचा खर्च त्यांना पेलवणारा नाही. आपल्या गरिबीची झळ आपल्या मुलीला बसू नये म्हणून त्यांनी कर्ज काढून तिचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे शिक्षणमुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे ती बीएसस्सी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. तिचे नातलग कोणीही मुंबईत रहात नसल्याने ती वसतिगृहात राहते. लॉकडाऊन काळात मे महिन्यात त्यांना आपापल्या गावी जा असे सांगण्यात आले. परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे असल्याने ती ५ मे रोजी गावी आली. ती लॉकडाऊन वाढत गेल्याने गावातच अडकली.... आणि तिकडे आॅनलाईन लेक्चर सुरू झाले.असे असते ऐश्वर्याचे आॅनलाईन शिक्षणगावातील घराकडे फोनला रेंज मिळत नाही तिथे इंटरनेट कुठून मिळणार? यासाठी डोंगर माथ्यावर फिरत असताना डोंगरात तिला इंटरनेट मिळाले. उन्हाळ्यात दिवसभर डोंगरावर झाडाखाली उभी राहून ती शिक्षण घेत होती. नंतर तिच्या वडिलांनी तिला एक झोपडी बांधून दिली. मोबाईल चार्जिंगचा प्रश्न येत असल्याने ती सकाळी ७.३० वाजता घरातून जाते ती दुपारी १ वाजता घरी येते. नंतर २ वाजता जाते ती सायंकाळी ४ च्या आसपास घरी येते. पूर्ण दिवस डोंगरातील त्या झोपडीतच जातो. लेक्चर नसेल त्या वेळेत ती सराव करते. अँड्रॉईड फोनचा प्रश्न तिच्या भावाने रक्षाबंधन दिवशी तो भेट दिल्याने सुटला.झोपडीत डासांचा सामनातिच्या शिक्षणाची दोन वर्षे पूर्ण झाली असून अजून दोन वर्षे बाकी आहेत. त्यानंतर सहा महिने सराव असणार आहे. सध्या ती या झोपडीत डासांचा सामना करीत आॅनलाईन शिक्षण घेत आहे. स्वप्नालीप्रमाणे तिलाही मदतीची गरज आहे. तिच्या पंखांना बळ देण्यासाठी मदतीची किनार लागणे आवश्यक आहे . 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग