शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधिकाऱ्यांचीच सभेला दांडी

By admin | Updated: April 2, 2015 00:46 IST

राजापूर पंचायत समिती : शुक्लकाष्टच्या धास्तीने फिरकलेच नाहीत

राजापूर : येथील तालुका कषी कार्यालयातील कथित लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण चांगलेच गाजत असून, आता चौकशीचे शुक्लकाष्ट आपल्या पाठीशी लागेल, या भीतीने हादरलेले कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीलाच दांडी मारली. हा सारा प्रकार घडत असतानाच पंचायत समिती सदस्यांपैकी कुणीच त्या विषयावर ब्र न काढल्याने आता सदस्यदेखील त्या प्रकाराला पाठीशी घालीत तर नाहीत ना? या शंकेला बळकटी मिळाली आहे.दोन दिवसांपूर्वी तालुका कृषी कार्यालयांतर्गत लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण उघडकीस आले. एका कृषी सहाय्यकाने कार्यालयीन कामकाजाचा लॅपटॉप कुणाला न सांगता तेथून अन्यत्र पळवून नेल्याची लेखी तक्रार राजापूर कृषी मंडल विभाग १चे मंडल अधिकारी ए. आर. कावतकर यांनी तालुका कृषी विभागाचे अधिकारी चंद्रमणी मेश्राम यांच्याकडे केली. त्यानंतर या प्रकरणात पुढे रंगत वाढत गेली व त्यातूनच लॅपटॉपवरुन चांगलीच जुंपली होती. आता या प्रकरणाचे पडसाद राजापूर पंचायत समितीच्या बैठकीत नक्की उमटतील व प्रकरण आपल्यावरच शेकेल शिवाय सर्वांसमक्ष जाबदेखील द्यावा लागेल, याची जाणीव असलेल्या कृषी विभागाच्या तालुका अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी व कर्मचारी यापैकी कुणीही या बैठकीला उपस्थित नव्हता.लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण गाजत असताना उपस्थित पंचायत समिती सदस्यांपैकी याबाबत कुणीही हा मुद्दा उपस्थित केला नाही. त्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता सदस्यदेखील त्या प्रकरणी कुणाला पाठीशी तर घालीत नाहीत ना? अशी चर्चा सुरु होती.दरवेळेप्रमाणे राजापूर पंचायत समितीच्या मासिक बैठकीला अनेक खात्यांचे प्रमुख काही ना काही कारणे पुढे करत अनुपस्थित राहिले. त्यामध्ये शिक्षण, सार्वजनिक, बांधकाम, महावितरण, ग्रामीण पाणी पुरवठा आदी विभागांचा समावेश होता. काही शाळांतील वर्गाची संख्या वाढवण्याबाबतचा मुद्दा उपस्थित होताच प्रथम परिपूर्ण शिक्षक द्या, मगच वर्ग वाढवा, अशी भूमिका माजी सभापती कमलाकर कदम यांनी घेतली. त्याला सत्ताधारी सेनेचे सदस्य दीपक नागले यांनी आक्षेप घेतला. यावरुन त्या दोघांत जुगलबंदी पाहावयास मिळाली तर ठेकेदार मिळाल्याशिवाय कामाचे बिल काढू नका, असे गटविकास अधिकारी सांगतात, असा आरोप माजी उपसभापती भाग्यश्री लाड यांनी केल्याने गटविकास अधिकाऱ्यांसमवेत त्यांची शाब्दिक चकमक उडाली. बैठकीनंतरही त्या दोघांत पुन्हा याच विषयावर जुंपली होती.तालुक्यात पाणीपट्टी, घरपट्टी यांसह आता विभागातील वसुली १०० टक्के झाली आहे, तर तालुक्यात जिल्हा परिषद शाळा, तळगाव क्र.२ व कोंढेतड क्र.२ यांना आदर्श शाळा म्हणून निवडण्यात आल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली. शिक्षण विभागाच्या कोलमडलेल्या कारभारावर चिंता व्यक्त करण्यात आली. शाळेतील किचन शेडचा विषयही चांगलाच चर्चेत आला. किचन शेडचे काम पूर्ण झाल्याशिवाय त्यांचे पैसे देऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. तालुक्यात ताम्हाने धनगरवाडी व मोरोशी या गावांना पाणीटंचाई जाणवत आहे. (प्रतिनिधी)