शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

कीर्तनानंतर पंढरपुरातच सोडला प्राण; ह.भ.प. दत्ताराम महाराज नागप यांचे हृदयविकाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 17:18 IST

मुंबईत अंत्यसंस्कार

वैभववाडी : सुप्रसिद्ध कीर्तनकार व अरुणा मध्यम प्रकल्प संघर्ष कृती समितीचे (मुंबई) सचिव, ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप महाराज (वय ६०) यांचे शुक्रवारी (दि.३१) पहाटे पंढरपूर येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कार्तिकी वारीसाठी बुधवारी (दि.२९) परिवारासह मुंबईहून पंढरपूरला गेले होते. कीर्तन आटोपून तेथील निवासस्थानी परतल्यावर पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.मांगवली तिठ्यावरील आखवणे-भोम-नागपवाडी पुनर्वसन गावठाणात त्यांचे निवासस्थान असून, ते संपूर्ण कुटुंबीयांसह मुंबईत वास्तव्यास होते. दत्ताराम महाराजांचे वडीलही वारकरी संप्रदायात कीर्तनकार होते. वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांनी वडिलांचा वारकरी संप्रदायासह कीर्तन वसा पुढे अखंड जोपासला होता. मुंबई 'बेस्ट'मधून दोन वर्षांपूर्वीच उच्च पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे वास्तव्य मुंबईत होते. तरी गावच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई सरचिटणीस म्हणून ते स्थापनेपासून काम करीत होते. अरुणा धरणग्रस्तांना 'खासबाब' म्हणून सानुग्रह अनुदान मंजूर करून घेण्यात त्यांचे सर्वांत जास्त योगदान आहे, तसेच धरणग्रस्तांचा मोबदला व आखवणे भोम, नागपवाडी पुनर्वसन गावठाण निर्मितीत व सेवा सुविधा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.

मुंबईत अंत्यसंस्कारदत्ताराम महाराज यांच्या अकाली निधनामुळे आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाणावर शोककळा पसरली आहे. पंढरपुरातून त्यांचे शव मुंबईत नेऊन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kirtankar Dattaram Maharaj Nagap Dies of Heart Attack in Pandharpur

Web Summary : Kirtankar Dattaram Sitaram Nagap Maharaj, 60, passed away in Pandharpur due to a heart attack after attending the Kartiki Wari. He was also secretary of the Aruna Project Struggle Committee and contributed to religious, social, and educational development in his village. He is survived by his wife, son, daughter, brother and sisters.