शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

मसुरेतील धनगर कुटुंबियांना ५0 वर्षानंतर न्याय

By admin | Updated: August 26, 2015 22:55 IST

कार्यकारी अभियंता पोहचले घरी : ऊर्जामंत्र्यांच्या आदेशानंतर त्वरित वीज जोडणी

बागायत : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने ५० वर्षानंतर नाना विठू वरक यांच्या घरी महावितरणचे कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप सोरटे स्वत: पोहोचले. त्यांचा वीजप्रश्न मार्गी लागला.मालवण तालुक्यातील मसुरे येथील दुर्गम अशा डोंगराळ भागात राहणाऱ्या नाना विठू वरक या धनगर कुटुंबियांच्या घरात गेली ५० वर्षांपासून विजेचा अभाव होता. मात्र सन २०१२ सालापासून अ‍ॅड. पूर्वा ठाकूर, गजानन ठाकूर, मालवण भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी वारंवार वीज वितरण कंपनीकडे पत्रव्यवहार केले होते. मात्र त्याला कंपनीने दाद दिली नव्हती. म्हणून तत्कालीन आमदार प्रमोद जठार यांच्या फंडातून तात्पुरती गरज म्हणून सौर पथदीप बसविलेला होता. मात्र २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिले होते की भाजपची सत्ता आल्यास आपल्या घरी विजेचा प्रकाश पाडू. त्याची वचनपूर्ती म्हणूनच व सामान्य माणसांची गरज म्हणून सोमवारी जिल्ह्यात आलेल्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन विजेपासून वंचित असलेल्या वरक कुटुंबियांची माहिती दिली. त्यावर ऊर्जामंत्र्यांनी तीन दिवसांत वरक कुटुंबियांच्या घरी विद्युत पुरवठा सुरु करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार मंगळवारी कणकवली विभागाचे महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सोरटे, रामगड उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता मोगल, महावितरण कंपनीचे कर्मचारी स्वप्नील धामापूरकर व अवगाण यांनी भेट दिली व वरक कुटुंबियांच्या घरापर्यंत वीज पुरवठा करण्यासाठी सर्व्हे करून त्वरित कागदपत्र पूर्ण करून घेऊन शासनाच्या योजनेचा लाभ दिला. वरक कुटुंबियांना विजेचा पुरवठा करण्यासाठी लागणारी अनामत रक्कम म्हणून सोरटे व मोगल यांनी स्वत: आपल्याकडील पैसे वरक कुटुंबियांच्याकडे सुपूर्द केले. वीज पुरवठ्यासाठी सुमारे पाच विजेचे खांब लागणार असून हे काम बुधवारी पूर्ण करावयाचे असल्याचे सोरटे यांनी स्पष्ट केले. यावेळी मसुरे ग्रामपंचायत सदस्य अ‍ॅड. पूर्वा ठाकूर, भाजपा मसुरे पंचायत समिती विभाग अध्यक्ष गजानन ठाकूर, प्रसाद परब, बापूजी बागवे, किशोर परब, विलास परब, सचिन परब, अमोल परब, गणेश सांडव, बाबू सांडव उपस्थित होते.यावेळी सोरटे यांचे अ‍ॅड. पूर्वा ठाकूर यांनी लक्ष वेधत मसुरे गावातील विजेच्या अनेक प्रश्नांना चालना देण्याचे काम केले. मसुरे मागवणे खाजणवाडी विजेचे खांब हे दलदल भागात असल्याने पावसाळ्यामध्ये वारंवार बिघाड होऊन प्राथमिक आरोग्यकेंद्र मसुरे-मागवणे येथील रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. तसेच त्या विभागातील वीजवाहिनीचे नूतनीकरण करण्यासाठी निवेदन दिले तर गोपी पालव यांनी बिळवस विभागातील वीज वाहिनीचे नूतनीकरण होण्यासाठी निवेदन दिले. त्यावर सोरटे यांनी सहा महिन्यांच्या आत पूर्ण मसुरे गावच्या वीज वाहिनीच्या नूतनीकरणाचे आश्वासन दिले. त्यावर सर्व ग्रामस्थांच्यावतीने व तालुका भाजपच्यावतीने गजानन ठाकूर व अ‍ॅड. पूर्वा ठाकूर यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे व ऊर्जामंत्र्यांचे आभार मानले. (वार्ताहर)