सावंतवाडी : येथील कळसूलकर इंग्लिश हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी २५ वर्षांनी एकत्र येऊन स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा शाळा भरविली. यावेळी त्यांनी शालेय आठवणींना उजाळा देतानाच शाळेतील सुविधा वाढण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. कळसूलकर या शाळेत १९८९ सालच्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी या शाळेत शिकून उच्च शिक्षणासाठी देशात- परदेशात गेलेल्या या विद्यार्थ्यांचा संपर्कही नव्हता. सर्व आपल्या पुढील शिक्षणात, व्यवसायात व्यस्त होते. मात्र, २५ वर्षांनंतर अखेर या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याचे ठरवून या शाळेतील शिक्षकांना सोबत घेऊन स्रेहमेळावा साजरा केला. यावेळी सर्व शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदोत्सव साजरा केला. त्याकाळी शिक्षण घेतलेल्या वर्ग खोल्यांमध्ये बसून शिक्षकांकडून पुन्हा शिक्षणाचा आनंद घेत शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांना शिकविले. यावेळी शिक्षक रमेश सापळे, पद्मा फातर्पेकर, अल्ताफ खान, कल्पना तेंडुलकर, के. एस. देवधर, डी. बी. पावसकर, के. एम. बेकनाळकर, पी. एन. पांगम, एस. एस. वैद्य, मुख्याध्यापक चंद्रकांत काटे, आदी उपस्थित होते. यावेळी आम्ही सर्व माजी विद्यार्थी शाळेसोबत असून शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी विद्यार्थी व पुण्याच्या उपमहापौर डॉ. मधुरा नेने, राजू मिशाळ, अरुण भिसे, अमोल ओटवणेकर, मुन्ना कोरगावकर, समीर वंजारी, सुधीर आडिवरेकर, माधव परब, अभिजित माने, माधवी पेडणेकर, सुनीता हडकर, वर्षा मणेरीकर, भारती घोडगे, शिल्पा पुरोहित, माया नेवगी, गुरुनाथ कदम, रूपाली पनवेलकर, रवींद्र तेली, अजय चिंदरकर, आदी माजी विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. (वार्ताहर)
स्नेहमेळाव्यात भरली २५ वर्षांनी शाळा
By admin | Updated: December 29, 2014 23:40 IST