शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विरोध डावलून कुडाळात मोरीचे बांधकाम, पाणी तुंबल्यास प्रशासन जबाबदार : भोगटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:04 IST

केळबाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधलेल्या मोरीची उंची आवश्यकतेपेक्षा जास्त ठेवली आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास किंवा पावसाळ्यात येथे पाणी तुंबल्यास त्याला सर्वस्वी सत्ताधारी व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक गणेश भोगटे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देपाणी तुंबल्यास प्रशासन जबाबदार : गणेश भोगटे नागरिकांचा विरोध डावलून कुडाळात मोरीचे बांधकाम

कुडाळ : नागरिकांचा विरोध डावलून येथील केळबाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधलेल्या मोरीची उंची आवश्यकतेपेक्षा जास्त ठेवली आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास किंवा पावसाळ्यात येथे पाणी तुंबल्यास त्याला सर्वस्वी सत्ताधारी व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक गणेश भोगटे यांनी दिला आहे. प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून नियोजनशून्य व पैशांची उधळपट्टी करून विकासकामे सुरू असल्याचा आरोपही भोगटे यांनी केला आहे.कुडाळ एसटी बसस्थानक ते श्री देवी केळबाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर माऊली कॉम्प्लेक्सजवळ असलेली जुनी मोरी नव्याने बांधण्यात आली आहे. मात्र, ही मोरी आवश्यकतेपेक्षा उंच बांधण्यात आली आहे.

मोरीची उंची वाढवू नये, अशी मागणी येथील ग्रामस्थांची होती. उंची वाढविल्यास तेथील सखल भागात असलेल्या गटारातील पाणी तुंबून सर्व पाणी आजूबाजूच्या परिसरातील दुकाने व घरांमध्ये पसरण्याची भीती आहे. मात्र, स्थानिकांचे मत आणि पुढे होणारे दुष्परिणाम विचारात न घेता या मोरीचे बांधकाम करण्यात आले आहे.पावसाळ्यात मोरीच्या आजूबाजूच्या सखल परिसरात पावसाचे व गटारातील पाणी तुंबून ते दुकाने व घरांमध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे. याचा नाहक त्रास येथील व्यापारी व नागरिकांना सहन करावा लागणार आहे, असे भोगटे यांनी म्हटले आहे.नागरिकांचा विरोध असतानाही मोरीची उंची जास्त ठेवल्याने भविष्यात दुर्घटना घडल्यास तसेच अन्य समस्या उद्भवल्यास त्याला सत्ताधारी व प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा भोगटे यांनी दिला आहे. तसेच या मोरीची उंची कमी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकsindhudurgसिंधुदुर्ग