शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

व्यसन कराल, बडतर्फ व्हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 00:34 IST

शिक्षकांना शिक्षा : ठाण्यातील संस्थेच्या निवेदनाची सरकारकडून दखल

टेंभ्ये : शालेय शिक्षण विभागाचे दररोज वेगवेगळे आदेश प्रसिद्ध होत आहेत. या सर्व आदेशांमुळे शिक्षण क्षेत्र अस्वस्थ बनले आहे. यामध्येच शासनाने ओरियन्टल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरमच्या निवेदनानुसार शिक्षकांच्या व्यसनांबाबत एक आदेश नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांचे मात्र धाबे दणाणले आहेत. या आदेशानुसार शिक्षकांना शालेय परिसरात कोणतेही व्यसन करता येणार नाही. तसे आढळल्यास शिक्षकांना बडतर्फ करण्याची शिक्षा सुचवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता आटोक्यात आणण्यासाठी शासन स्तरावरुन हा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे.शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) यांच्याकडून प्रसिद्ध झालेला हा आदेश राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना पाठवण्यात आला आहे. ओरियन्टल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरम, ठाणे यांच्यामार्फत देण्यात आलेल्या निवेदनाच्या आधारे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने हा आदेश काढला आहे. राज्यातील काही शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना खर्रा, तंबाखू, दारु तसेच पानाचे सेवन करुन शिकवत असल्याचे संबंधित फोरमने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. शिक्षकांच्या या व्यसनाधिनतेचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधिनता वाढत आहे, असे मत संबंधित फोरमने व्यक्त केले आहे.या फोरमने आपल्या निवेदनात संबंधित शिक्षकांना बढती न देणे, पुरस्कार न देणे, शासनाच्या सुविधांपासून वंचित ठेवणे, जे शिक्षक ऐकणार नाहीत त्यांना बडतर्फ करावे अशा शिक्षा प्रस्तावित केल्या आहेत. याबाबत उचित कार्यवाही करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. याबाबत शिक्षकांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात नाराजी पहायला मिळत आहे. शासनाने काही ठराविक शिक्षकांमुळे व एका विशिष्ट संस्थेच्या निवेदनाच्या आधारे राज्यातील सर्व शिक्षकांना व्यसनाधीन ठरवल्याची खंत व्यक्त केली जात आहे. या आदेशामुळे शिक्षण क्षेत्राची बदनामी झाल्याचे मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांमधील व्यसनाधिनतेला केवळ शिक्षकाला जबाबदार ठरवणे अजब असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे. (वार्ताहर)अयोग्य निर्णय : नियमांचा विचार होणे आवश्यकव्यसनी शिक्षकांच्या पाठी कोणतीही संघटना अथवा संस्था असत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये एक ते दोन टक्के लोेक वेगवेगळ्या प्रवृत्तीचे असतात. म्हणून ते सर्व क्षेत्र बदनाम ठरवणे अयोग्य आहे. व्यसनाधिनतेबाबतचे स्पष्ट नियम यापूर्वी शासनाने निश्चित केले आहेत. त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याऐवजी एखाद्या संस्थेने दिलेल्या पत्राची दखल घेत त्यांनी सुचवलेल्या शिक्षा, नियमांचा विचार न करता प्रस्तावित करणे अयोग्य आहे. यामुळे शिक्षण क्षेत्र बदनाम होते. यापेक्षा शासनाने प्रस्थापित नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी व बाह्य घटकापेक्षा शिक्षकांवर विश्वास दाखवावा. - भारत घुले,जिल्हाध्यक्ष, माध्यमिक अध्यापक संघसंमिश्र प्रतिक्रियाशाळांमध्ये काहीवेळा शिक्षकच व्यसन करतात. या बाबींना आळा बसावा, यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाबाबत शिक्षक संघटनांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.