शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

By admin | Updated: September 1, 2015 21:25 IST

संदेश सावंत : शिक्षकदिनी वितरण, सतरा प्रस्तावांमधून आठ जणांची निवड

सिंधुदुर्गनगरी : प्राथमिक शाळांतील शिक्षकांना दरवर्षी देण्यात येणारे आठ आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून ५ सप्टेंबर रोजी येथील जिल्हा नियोजन सभागृहात या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिली.आदर्श शिक्षण पुरस्कारासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे तालुकास्तरावरून १७ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यामध्ये वैभववाडी तालुक्यातून २, मालवण २, कुडाळ ३, वेंगुर्ले २, सावंतवाडी १, दोडामार्ग २, कणकवली ३, देवगड २ असे प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा होऊन निकषात बसणारे आठ प्रस्तावांची निवड करून ते मंजुरीसाठी कोकण विभागाच्या आयुक्त कार्यालयाकडे २१ आॅगस्ट रोजी सादर करण्यात आले होते. यातील आठही तालुक्यातील प्रत्येकी एका प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत आदर्श शिक्षक निवडले जातात. त्यासाठी प्राथमिक शाळांमधील प्रत्येक तालुक्याचे प्रस्ताव मागविले जातात. त्या प्रस्तावांची छाननी करून प्रत्येक तालुक्यातून एक असे एकूण आठ प्रस्ताव कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी आठ सदस्यीय समितीमार्फत पाठविले जातात. सन २०१५ च्या पुरस्कारांना मान्यता मिळाली असून शिक्षकदिनी म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी भवनातील जिल्हा नियोजन सभागृहात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. ५०० रुपये, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप राहणार असून शिक्षकांच्या पत्नीची ओटीही भरण्यात येणार आहे, अशी माहिती संदेश सावंत यांनी दिली. यावेळी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)...हे आहेत मानकरी संदेश सावंत यांनी मंगळवारी आदर्श शिक्षकांची नावे जाहीर केली. यामध्ये वैभववाडी तालुक्यातून बाळासाहेब श्रीधर कोलते (उपशिक्षक-विद्यामंदिर आचिर्णे), मालवण तालुक्यातून कल्पना अशोक परब (उच्चश्रेणी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर संयुक्त मोगरणे), कुडाळ तालुक्यातून उदय रमाकांत गोसावी (पदवीधर शिक्षक - जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वालावल पूर्व), वेंगुर्ले तालुक्यातून दत्तगुरु सदानंद कांबळी (पदवीधर शिक्षक, दाभोली नं. १ शाळा), सावंतवाडी तालुक्यातून महेश विष्णू पालव (पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद शाळा कास नं. १), दोडामार्ग तालुक्यातून जयसिंग बळीराम खानोलकर (पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साटेली भेडशी), कणकवली तालुक्यातून कृष्णा पंढरी सावंत (पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवे), देवगड तालुक्यातून धर्मराज पांडुरंग धुरत (पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इळये नं. १) यांचा समावेश आहे.