शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

शृंगारतळीत आदर्श ‘रॉयल’ घोटाळा

By admin | Updated: April 20, 2015 00:13 IST

शासनाची फसवणूक : जुन्या इमारतीचा नकाशा जोडून बेकायदेशीर इमारतीचे खरेदीखत

गुहागर : शृंगारतळीतील महाराष्ट्र कन्स्ट्रक्शनकडून शासनाची झालेली फसवणूक समोर आली आहे. महाराष्ट्र कन्स्ट्रक्शन्समार्फत बांधण्यात आलेल्या रॉयल अपार्टमेंटमधील सांडपाणी प्रश्नामुळे हा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. तहसीलदारांमार्फ त दंडात्मक कारवाईने कायम करण्यात आलेल्या पहिल्या इमारतीचा नकाशा जोडून बेकायदेशीर बांधलेल्या दुसऱ्या इमारतीमधील सदनिकांचे दुय्यम निबंधकांसमोर खरेदीखत करण्यात आली आहेत. येथील रहिवाशांनी आता ही बाब तहसीलदार वैशाली पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर काय कारवाई होते यामध्ये गुहागरवासियांचे लक्ष लागले आहे.पाटपन्हाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शृंगारतळी येथील सर्वे नं. २८ (अ) हिस्सा नं. ४ पैकी १८ गुंठे क्षेत्रात रॉयल अपार्टमेंटचे बांधकाम करण्यात आले आहे. यामध्ये ‘ए’ विंग, ‘बी’ विकंग आणि ‘सी’ विंग अशा तीन इमारती बांधण्यात आल्या आहेत. पहिल्या ‘ए’ इमारतीच्या बांधकामानंतर तत्कालीन तहसीलदार जीवन कांबळे यांनी दंडात्मक कारवाई करुन २१ जुलै २०१२ रोजी बिनशेती परवानगी देण्यात आली आहे. या इमारतीमध्ये एकूण २४ निवासी सदनिका आहेत. या चोवीस सदनिकांसाठी २०७३५७१५ लांबी, रुंदी व उंचीची एकच एक शौचालयासाठीची टाकी बांधण्यात आलेली आहे. याच टाकीत इमारतीतील अन्य सांडपाणी व्यवस्थापन केलेले आहे. सन २०१३ मध्ये ‘ए’ इमारतीच्या सदनिकांचा ताबा खरेदीखताद्वारे देण्यात आला. पाठोपाठ २० सदनिका व १८ दुकान गाळ्यांची ‘बी’ इमारत बांधण्यात आली. त्यापैकी १४ सदनिकांची हातोहात विक्रीदेखील करण्यात आली आहे. मात्र या ‘बी’ विंग इमारतीला स्वतंत्र शौचालय टाकी बांधण्यात आलेली नाही. यानंतर बांधण्यात आलेल्या सी इमारतीसाठीदेखील विकासकांनी शौचालय टाकी बांधलेली नाही. १८ गुंठे जमिनीत तीन इमारती बांधल्या गेल्या. स्वतंत्र शौचालय टाकी नाही. मलमुत्र व सांडपाणी निस्सारणाचे योग्य नियोजन नाही. अशा परिस्थितीत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह अन्य कोणत्याही संबंधित शासकीय प्रशासनाने लक्ष घालण्याची तसदी घेतलेली नाही. यातही आर्थिक उलाढाल कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते पण खरा घोटाळा याहुनही मोठा आहे.‘बी’ इमारतीतील १८ गाळे विकले गेलेले आहेत. ए इमारतीनंतर त्याच १८ गुंठे जमिनीला परवानगी मिळणार कुठून यावर उपाय म्हणून गुहागर दुय्यम निबंधकांसमोर ‘बी’ इमारतीमधील सदनिकांचे खरेदीखत करताना इमारतीचा नकाशा म्हणून २१ जुलै २०१२ रोजी तत्कालीन तहसीलदार जिवन कांबळे यांच्यासहिने मंजूर करण्यात आलेला ए इमारतीचा नकाशा जोडण्यात आला. चुकीच्या पद्धतीने व्यवहार होत असताना दुय्यम निबंधकांनी कोणत्या प्रकारे कागदपत्रांची पहाणी केली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते.दोन्ही इमारतीमधील ४२ सदनिकांची आतापर्यंत विक्री झाली आहे. तिसऱ्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर महाराष्ट्र कन्स्ट्रक्शनचे मालक महमद हसनमिया कारभारी यांचे कुुटुंब राहते. अशा प्रकारे या सर्व सदनिकांमधील मलनिस्सारणासाठी एकच शौचालय टाकी असल्याने ती वारंवार भरुन वाहते. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदनिकाधारकांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावर वारंवार याबाबत आवाज उठवला. मात्र ग्रामपंचायतीचे कारभारी यांना कायम पाठीशी घातले. वारंवार होत असलेल्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येथील सदनिकाधारकांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत अखेर महाराष्ट्र कन्स्ट्रक्शनच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला. गुहागरच्या तहसीलदार वैशाली पाटील यांना या गैरव्यवहाराचे पुरावे त्यांनी सादर केले आहेत. त्यामुळे आता काय कारवाई होते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. पत्रकार परिषदेत इमरान रफीक घारे, जी. एस. क्षीरसागर, सुरेंद्र रामा जाक्कर, व्ही. एस. कदम, तलहा मुकादम, निळकंठ नारायण पावसकर, मुजफ्फर मुकादम, अशपाक कुपे आदी सदनिकाधारक उपस्थित होते. या सदनिकाधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, शिक्षकांचा समावेश आहे. (वार्ताहर)ही बाब अतिशय गंभीर असून माहिती मिळताच पाटपन्हाळे मंडळ अधिकारी व्ही. एम. यादव यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. आज रविवार सुट्टी असून सोमवारी याबाबतचा सविस्तर अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.- वैशाली पाटील, तहसीलदार, गुहागर.शृंगारतळीतील महाराष्ट्र कन्स्ट्रक्शनकडून शासनाची फसवणूकसांडपाणी प्रश्नामुळे घोटाळा उघडकीससदनिकाधारकांनी केला पर्दाफाशव्यापारी, कर्मचारी सदनिकाधारक१८ गुंठ्यात तीन इमारतीखरेदीखतातही घोटाळाशृंगारतळीतील अनधिकृत बांधकामे रडारवर