शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या होड्यांवर कारवाई

By admin | Updated: October 2, 2016 00:15 IST

महसूलची मोहीम : ३० सप्टेंबरला मुदत संपताच कलावल-तेरई खाडीपात्रात प्रशासन सक्रीय

मालवण : सिंधुदुर्गात होणाऱ्या वाळू उत्खननाची मुदत शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी संपली असून अनधिकृत वाळू उत्खननावर महसूल व खनिकर्म विभागाची करडी नजर आहे. शुक्रवारी वाळू उत्खनन परवान्याची मुदत संपली असतानाही हडी व कालावल-तेरई खाडीपात्रात अनधिकृत वाळू उपसा करणऱ्या तब्बल सहा होड्यांवर जिल्हा खनिकर्म प्रशासनाने शनिवारी पहाटे सहा वाजता कारवाई केली आहे. वाळू उत्खनन बंदीच्या पहिल्याच दिवशी प्रशासनकडून धडक कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने वाळू व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. वाळू उत्खननाची मुदत ३० सप्टेंबरला संपली आहे. त्यामुळे पुढील वाळू पट्ट्यांची लिलाव प्रक्रिया होत नाही तोपर्यंत वाळू उत्खननावर बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालवधीत अनधिकृत वाळू उपसा होत असल्यास महसूल प्रशासनकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. खनिकर्म विभागाने केलेल्या कारवाईतील सहाही होड्यांचा पंचनामा करण्यात आला असून सोमवारी दंडात्मक कारवाई निश्चित केली जाईल, असे तहसीलदार वीरधवल खाडे यांनी स्पष्ट केले. यापुढेही अनधिकृत वाळू उत्खननावर महसूलकडून कारवाई केली जाईल, असेही खाडे यांनी सांगितले. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष लागून राहिले आहे. वाळू उत्खननाची मुदत संपली असल्याने खनिकर्म विभागाच्या वतीने भल्या पहाटे अनधिकृत वाळू उत्खनन होत असलेल्या ठिकाणी कारवाईची मोहीम राबविण्यात आली. वाळू उत्खनन बंदीच्या पहिल्याच दिवशी खनिकर्म विभागाने धाड टाकत वाळू उत्खनन करताना होड्यांना पकडले. वाळूचा पंचनामा करून होड्या मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या असल्या तरी संबंधित मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया महसूल विभागाकडून होणार आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यात दीपक सुर्वे यांची साडेतीन ब्रास, सुनील शेडगे यांची साडेतीन ब्रास, अमोल हुनारे तीन ब्रास, स्वप्नील मिठबावकर अडीच ब्रास, दीपक सुर्वे तीन ब्रास तर अन्य एका होडीवर कारवाई करण्यात आली. गणेश चतुर्थीत १५ दिवस डंपर वाहतुकीवर बंदी असल्याने गणेशोत्सवात वाळू उत्खनन बंद होते. मात्र त्या १५ दिवसाची वाढीव मुदतीबाबत वाळू व्यावसायिकांकडून प्रशासनाकडे मुदत वाढ मागितली होती का? असाही सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने केलेल्या पहिल्याच दिवशी कारवाई केल्याने वाळू व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली. वाळू उत्खनन मुदत संपली असली ती वाळू व्यावसायिकांच्या वाळू साठे शिल्लक असल्यास त्यांना वाळू उपाशाची परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी वाळू व्यवसायिकांतून होत आहे. याबाबत तहसीलदार खाडे यांना विचारले असता वाळू व्यवसायिकांच्या मुदतवाढीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरचा आहे. पण जर वाळू साठा करून ठेवला असल्यास जिल्हाधिकारी स्तरावर पास मिळण्याबाबत कार्यवाही होईल, खाडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)