शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

परिमंडलातील बारा जणांवर कारवाई

By admin | Updated: March 26, 2015 00:08 IST

कोकण विभाग : वीजचोरीविरोधात महावितरणची कडक मोहीम

रत्नागिरी : आकडा टाकून वीजेची चोरी, अनधिकृत वीज जोडण्या, शिवाय मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणाऱ्या ५७२ ग्राहकांवर कोकण परिमंडलाकडून कारवाई करण्यात आली असून १ कोटी ३३ लाख ४ हजार ३४८.७२ रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. पैकी १२ ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. हूक किंवा आकडा टाकून चोरी करणाऱ्या २२ ग्राहकांना पकडण्यात आले होते त्यांच्यावर ९८ हजार २४३ रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. रत्नागिरी विभागात ६ तर सिंधुदुर्ग विभागात १६ असून, सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक आकडा टाकणाऱ्यांना पकडण्यात आले आहे. पैकी रत्नागिरी विभागातील एक व सिंधुदुर्गातील सहा जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित सात ग्राहकांवर ४७ हजार ५५५ रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच १५ ग्राहकांनी ५३ हजाराचा दंड भरला आहे.अनधिकृत वीज जोडण्या रत्नागिरी विभागात ५४ तर सिंधुदुर्ग विभागात ५८ मिळून ११२ ग्राहकांवर १६ लाख १८ हजार २२८.३७ रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पैकी एकूण ८९ ग्राहकांकडून १२ लाख ३१ हजार ४०९.३७ रूपये वसूल करण्यात आले आहे.मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या ४३८ ग्राहकांवर कारवाई करीत ८६ लाख १७ हजार ८७७.३५ रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. पैकी ३९२ ग्राहकांनी १५ लाख २० हजार रूपये भरून वीज पुरवठा पूर्ववत करून घेतला आहे. पैकी रत्नागिरी विभागातील ४ व सिंधुदुर्गातील १ मिळून एकूण ५ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पाच ग्राहकांवर ५५ लाख ४ हजार २१० रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वीजमीटर छेडछाडीमध्ये रत्नागिरी विभागात ३८५ तर सिंधुदुर्गमध्ये ५३ ग्राहक आढळले आहेत.महावितरणकडून सध्या फिडरनिहाय भारनियमन सुरू करण्यात आले आहे. ज्या फिडरवर वीज हानी अधिक शिवाय वसुली कमी असणाऱ्या फिडरची वर्गवारी करून भारनियमन करण्यात येते. शिवाय संगणक प्रणालीमुळे कोणत्या भागात वीजचोरी होते तात्काळ लक्षात येत असल्याने महावितरणच्या पथकाकडून वीजचोरी पकडण्यात येत आहे. एकूण ५७२ ग्राहकांपैकी रत्नागिरी जिल्ह्यात तीनही प्रवर्गातील ४४५ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२७ ग्राहक आढळले आहेत. संबंधित कारवाई १ एप्रिल ते २८ फेब्रुवारी अखेर करण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण विभागात ११७, खेड विभागात १३३ तर रत्नागिरी विभागात १३० तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विभागात २९ तर कणकवली विभागात ९८ ग्राहक सापडले असून सर्वाधिक वीज चोरी खेड विभागात होत असली तरी पाठोपाठ रत्नागिरी विभागात चोरीचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)वीज चोरी, अनधिकृत वीज जोडण्या व मीटरमध्ये छेडछेडीची प्रकरणे५७२ ग्राहकांवर कारवाईचा बडगा१२ जणांवर कायदेशीर कारवाई१ लाखाहून अधिक दंड आकारलाखेड विभागात वीज चोरीची सर्वाधिक प्रकरणे, रत्नागिरी विभागातही लक्षणीय वाढ