शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विजयदुर्गजवळील अपघातग्रत तेलवाहतूक जहाजातून गळती? रत्नागिरीच्या कोस्ट गार्ड विभागाने दिली महत्वाची माहिती

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 17, 2022 18:49 IST

पाण्याची तपासणी करण्याच्या सूचना

सिंधुदुर्ग : विजयदुर्ग ते देवगड दरम्यान ४० ते ४५ वाव पाण्यात पार्थ हे १०१ मी. लांबीचे तेल वाहू जहाज १६ सप्टेंबर रोजी अपघातग्रत झाले आहे. अपघातात जहाजावरील १९ खलाशी यांना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेच्या अनुषंगाने कमाडंट कोस्ट गार्ड रत्नागिरी यांचेकडून प्राप्त माहितीनुसार बुडालेल्या जहाजावर कोस्ट गार्डची यंत्रणा लक्ष ठेवून आहे. अद्याप जहाजातून कोणत्याही प्रकारे तेल गळती सुरु झालेली नाही. अशी माहिती कोस्ट गार्ड रत्नागिरीचे कमांडट यांनी दिली.या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही माहिती आवश्यक असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या ०२३६२-२२८८४७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.घटनेच्या अनुषंगाने प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय मालवण, तहसिलदार देवगड, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन देवगड यांना संयुक्तरित्या स्थळ पाहणी करुन अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांना सादर करण्याच्या तसेच घटनेच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये कोणत्याही अफवा पसरणार नाहीत याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्याकडून देण्यात आली आहे.आवश्यक खबरदारीहे तेलवाहू जहाज असल्याने या जहाजातून तेल गळती झाल्यास विजयदूर्ग ते मालवण भागात तेल प्रदूषण होण्याची शक्यता आहे. मात्र अशी तेल गळती झाल्यास त्यावर त्वरीत उपाययोजना करता यावीत. या करीता कोस्ट गार्डचे एक जहाज चोवीस तास परिस्थितीचे निरीक्षण करीत आहे. तेल गळती होऊन तेल समुद्र किनाऱ्यावर येवू नये याकरीता आवश्यक ती खबरदारी कोस्ट गार्ड करुन घेण्यात येत आहे.जहाजात मोठा डांबर साठाया घटनेच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय मालवण यांनी आवश्यक त्या सूचना मच्छिमार सोसायट्यांना निर्गमित केलेल्या असून परवाना अधिकारी देवगड, मालवण व वेंगुर्ला यांना मुख्यालय न सोडणे बाबत आदेशित करण्यात आलेले आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला यांच्याकडून जहाजाच्या मालकाला याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे. जहाजात सद्यस्थितीत डांबर साठा असून हा साठा पाण्याच्या तळाशी जावून बसणार आहे. त्यामुळे तेल गळतीचा धोका कमी असल्याचे प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला यांनी सांगितले आहे.पाण्याची तपासणी करण्याच्या सूचनातेल गळती झाली किंवा कसे याची पाहणी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी यांना कळविण्यात आलेले असून समुद्राच्या पाण्याची तपासणी करून या बाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग