शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आमदार वैभव नाईक यांना एसीबीची पुन्हा नोटीस, चौकशीसाठी हजर राहणार? 

By सुधीर राणे | Updated: June 14, 2023 13:26 IST

कणकवली: रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय (एसीबी) कडून उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक यांना जबाब नोंदणीसाठी ...

कणकवली: रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय (एसीबी) कडून उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक यांना जबाब नोंदणीसाठी  पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच २८ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात  आले आहे. या नोटिसीत म्हटले आहे की, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून आपल्या मालमत्तेच्या अनुषंगाने चौकशी सुरु करण्यात आली आहे. या उघड चौकशीच्या अनुषंगाने १ जानेवारी २००२ ते २९ सप्टेंबर २०२२ या कालावधीतील आपले उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबत मत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्म्स त्यामध्ये नमुद मुद्याच्या अनुषंगाने भरुन दिलेले आहेत. त्या फॉर्म्स मधील आपण दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपला जबाब नोंद करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२२, ९ नोव्हेंबर २०२२, ३० नोव्हेंबर २०२२,२डिसेंबर २०२२, ९डिसेंबर २०२२ व ३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयात उपस्थित रहाण्याबाबत कळविण्यात आले आहे.परंतु त्यावेळी आपण उपस्थित राहिलेले नाहीत. त्या उघड चौकशीच्या अनुषंगाने विविध माहिती व कागदपत्रे सादर करण्यासाठी आपण २८ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय येथे उपस्थित रहावे. अशी सूचना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीचे पोलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी या नोटिशीद्वारे केली आहे. दरम्यान, आमदार वैभव नाईक चौकशीसाठी उपस्थित राहतात का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक