शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आबलोलीत बारशीला तरुण बनतात वाघ अन्...

By admin | Updated: November 27, 2015 00:14 IST

गुहागर तालुका : ग्रामीण भागात प्राचीन परंपरांचे जतन; बच्चे कंपनीसह तरुणांचाही सहभाग

अमोल पवार ल्ल आबलोली२१व्या शतकात जग चंद्रावर, मंगळावर पोहोचले असले तरी ग्रामीण भागात आजही आपल्या प्राचीन परंपरांचे जतन केले जात आहे. त्यातीलच एक परंपरेने साजरा होणारा सण म्हणजे वाघबारशी. गुहागर तालुक्यातील आबलोली येथील ग्रामस्थांनी वाघबारशी सण साजरा केला. या सणामध्ये बालदोस्तही सहभागी झाले होते.दरवर्षी कार्तिक द्वादशीला गावातील शेतकरी-गुराखी बांधव हा उत्सव एकत्रितपणे साजरा करतात. या उत्सवात अबालवृद्धांसह तरुणांचा मोठा सहभाग असतो. कडेकपारीत वसलेले आपले शेतकरी - गुराखी रानावनातून शेती करतात, जनावरे चारतात. अशावेळी त्यांच्या रक्षणाची जबाबदारी जंगलातील जांगलदेवाकडे असते. शेतकऱ्यांकडे असणारी दुभती जनावरे, शेती कामाकरिता लागणारे बैल, रेडे हे चरून झाल्यावर एका विशिष्ट ठिकाणी थांबतात, त्यांच्यामागून फिरणारे गुराखी त्या ठिकाणी विश्रांती घेतात. सोबत आणलेली चटणी-भाकरी खातात. या ठिकाणच्या मोकळ्या मैदानाला गोठण असे म्हणतात. गुरेढोरे निवांतपणे रवंथ करतात. जणूकाही हे सारे जांगलदेवाच्या कृपेनेच सुरळीत सुरु असल्याची त्यांची धारणा असते. म्हणूनच आजच्या दिवशी अशा ठिकाणी गोड खिरीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि सर्वजण एकत्रितपणे हा खिरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून भक्ष्यण करतात.वाघबारशीच्या दिवशी काही तरुणांना शेपटी लावली जाते. अंगावर रंगीबेरंगी पट्टे काढले जातात. मुखवटे परिधान केले जातात आणि प्रतिकात्मक वाघ म्हणून वाडी-वस्ती गावातून पिटाळत गावाबाहेर नेले जाते. त्याच्यावर शेण-मातीचे गोळे फेकले जातात. गावाबाहेर पिटाळताना वाघरु वाघरु असे ओरडतात. नंतर गावाच्या वेशीजवळ नदीवर सर्वजण आंघोळ करतात. नैवेद्य देवाला दाखवून स्वत: भक्ष्यण करतात. जांगलदेवाला सर्वांच्या रक्षणाचे साकडे घालतात. संध्याकाळी तुलसी विवाह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आबलोलीतील या प्रथेला हजारो वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते आणि ही परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने गावात जपली जात आहे. विशेष म्हणजे या उत्सवात लहान मुले, तरुण, वयोवृद्ध यांचा सहभाग असतो. त्यामुळे दोन-तीन पिढ्यांच्या एकत्रित समन्वयातून हा उत्सव साजरा होताना दिसतो. काळ कितीही बदलला तरी अजूनही आपले सण-उत्सव, प्रथा परंपरा सहजीवनासाठी नक्कीच पूरक ठरत आहेत.