शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

गोवा येथून कामावरून घरी परतत असताना दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 15, 2024 18:45 IST

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग ) : शिरोडा वेंगुर्ला सागरी मार्गावर सागरतीर्थ बागकरवाडी येथे मध्यरात्री गोवा येथून कामावरून परतत असताना झालेल्या दुचाकी ...

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग ) : शिरोडा वेंगुर्ला सागरी मार्गावर सागरतीर्थ बागकरवाडी येथे मध्यरात्री गोवा येथून कामावरून परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात सागरतीर्थ न्हैचीआड येथील संकेत किशोर पेडणेकर या २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

संकेत हा गोवा येथे मोपा विमानतळावर कामाला होता.  शुक्रवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास गोवा कामावरून घरी परतत असताना शिरोडा वेंगुर्ला मार्गावर सागरतीर्थ बागकरवाडी येथे संकेत याच्या ताब्यातील एमएम ०७एके ६१२० या नंबरची हिरो पेंशन एक्स प्रो ही दुचाकी रस्त्याच्या डाव्या कडेला खाली जाऊन बाजूला असलेल्या लोखंडी गेट आदळली व हा अपघात झाला. 

दरम्यान या घटनेची माहिती मध्यरात्री २.३० च्या दरम्यान तेथून जाणाऱ्या टेम्पो चालकाने वेंगुर्ला पोलिसांना दिल्यानुसार त्याठिकाणी पेट्रोलिंग करणारे वेंगुर्ला पोलिस हेड कॉन्स्टेबल बंड्या धुरी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश तावडे व होमगार्ड घाडीगावकर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वेंगुर्ला पोलिसांनी आपल्या वाहनात घालून संकेत याला शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

यानंतर घटनास्थळी पंचनामा करत मृतदेह रेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या अपघाताचा तपास वेंगुर्ला पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत. मृत संकेतच्या पश्चात आई, वडील व बहीण, काका काकी असा परिवार आहे.

टॅग्स :Accidentअपघात