शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

Sindhudurg: दोडामार्ग परिसरात दिवसाढवळ्या आढळला पट्टेरी वाघ

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 16, 2024 18:31 IST

काही काळ स्तब्ध, जंगलात ठोकली धूम

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : सावंतवाडी तालुक्यातील आंबोली ते दोडामार्ग तालुक्यातील मांगेली अन् पुढे गोव्याचे म्हादई खोरे हा सह्याद्रीचा पट्टा ‘टायगर कॉरिडॉर’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी वन्यजीव अभ्यासक व पर्यावरणतज्ज्ञ करीत असतानाच शनिवारी दोडामार्ग परिसरात  दिवसाढवळ्या एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे.शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस व त्यांच्या सहकाऱ्यांना हा वाघ दिसून आला. त्यांनी तो आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केला. या घटनेमुळे मात्र वन्यजीव अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, इथली जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.आंबोली ते मांगेली आणि पुढे म्हादई खोरे हा सह्याद्री पट्ट्याचा परिसर जैवविविधतेने संपन्न आहे. या ठिकाणी विविध प्रजातींचे दुर्मीळ पशू-पक्षी आणि प्राणी आढळतात. पट्टेरी वाघाचे अस्तित्व देखील या भागात असल्याचे बोलले जात होते. अनेकदा ते सिद्धही झाले; मात्र वनविभाग अनेकदा ते नाकारत होता; मात्र आता तर पट्टेरी वाघाचे अस्तित्व दाखवून देणारी आणि वनविभागाच्या डोळ्यांत अंजन घालणारी घटना घडली आहे.

दोडामार्ग परिसरात पट्टेरी वाघ आढळून आल्याने इथली जैवविविधता समोर आली आहे. शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत काही कामानिमित्त शनिवारी सकाळी ११:३० वा.च्या सुमारास कारने तळकटहून कुंभवडेच्या दिशेने जात होते. या रस्त्यावरील खडपडे येथे त्यांची कार आली असता रस्त्यालगतच्या जंगलातील ओहोळातून एक पट्टेरी वाघ जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ कारचालकास कार थांबवण्यास व वाघ असल्याचे सांगितले.

काही काळ स्तब्ध, जंगलात ठोकली धूमगणेशप्रसाद गवस व त्यांच्या सहकाऱ्यांनी या पट्टेरी वाघाची छबी त्यांच्या मोबाइलमध्ये कैद केली. त्याचे काही व्हिडीओ देखील काढले. वाहन थांबल्याचे पाहून वाघही काहीवेळ एका जागेवर स्तब्ध उभा राहिला. त्यानंतर वाघाने जंगलात धूम ठोकली; मात्र या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी सुखावले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTigerवाघ