शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी तालुक्यात रातोरात उभारण्यात आला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

By अनंत खं.जाधव | Updated: September 11, 2022 18:16 IST

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे रातोराथ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. 

सिंधुदुर्ग(सावंतवाडी) : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील पेट्रोल पंपासमोर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर काही ग्रामस्थांनी पुढे येत रात्रीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारल्याने एकच खळबळ उडाली नेमका हा पुतळा कोणी उभारला हे समजू शकले नाही. मात्र माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा पुतळा उभारण्यासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज देण्यात आले असे समोर आले. पण उर्वरित परवानग्या घेण्यात आल्या नसल्याने उशिरापर्यंत इतर अधिकारी आले नव्हते असे मेंगडे म्हणाले. 

मळगाव येथील पेट्रोल पंपासमोर दोन रस्त्याच्या मधोमध असलेल्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रविवारी सकाळी सगळ्यांच्या नजरेस पडला आणि एकच आश्चर्य व्यक्त करण्यात आले नेमका हा पुतळा कोणी उभारला हे समजू शकले नसले तरी ग्रामस्थांच्या पुढाकारातून हा पुतळा उभारण्यात आल्याचे अनेकांकडून सांगण्यात आले या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ ही जमा झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची बातमी पोलीस प्रशासनापर्यंत पोहचल्यानंतर तात्काळ त्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला त्यानंतर पशासकीय यंत्रणा चांगलीच सर्तक झाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी ही केली तसेच ग्रामपंचायत कडून माहिती घेतली. 

 सध्यातरी हा पुतळा अनधिकृत असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे तो नेमका कोणाच्या जागेत आहे या सगळ्याची चौकशी होणार आहे. दरम्यान परिसरामध्ये पुतळा उभारण्यास परवानगी मिळावी असा ठराव ग्रामस्थांकडून मळगाव ग्रामपंचायतीत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामसभेत ही ठराव घेण्यात आला होता असेही सांगितले जात आहे.

रातोरात उभारण्यात आला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळाग्रामसभेनेही ठराव संमत करताना जिल्हा प्रशासनाची आवश्यक परवानगी घेऊनच व त्यांच्या अटीची पूर्तता करूनच हा पुतळा उभारण्यात यावा असे म्हटले होते परंतु या संदर्भात कुठलीही कागदोपत्री पूर्तता न करता रातोरात हा पुतळा उभारण्यात आल्याने खळबळ उडाली असून छत्रपती प्रेमी कडून हा पुतळा उभारण्यात आला असून सध्या तरी तो अनधिकृतच असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेमका पुतळा कोणाच्या जागेत आहे त्या संदर्भात आवश्यक परवानगी घेण्यात आल्या आहेत का या सगळ्या गोष्टींची चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. यानंतरच या पुतळ्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून निर्णय घेतला जाईल असे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज