शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत यंदाही भरणार दिवाळी विशेष बाजार; स्टॉलवर टेबल, खुर्ची, विजेची मोफत व्यवस्था

By सुधीर राणे | Updated: October 8, 2022 15:35 IST

२३ ऑक्टोबर पर्यंत हा बाजार सुरू राहणार

कणकवली : स्थानिक व्यावसायिक तसेच बचतगटातील महिलांना आपली उत्पादने विकण्यासाठी हक्काची जागा व बाजारपेठ मिळावी यासाठी गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कणकवली येथे विशेष दिवाळी बाजार भरवण्यात येणार आहे. आमदार नितेश राणेंच्या हस्ते १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता या दिवाळी बाजाराचे उद्घाटन होणार आहे. २३ ऑक्टोबर पर्यंत हा बाजार सुरू राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक बंडू गांगण आदी उपस्थित होते.नलावडे म्हणाले, हा दिवाळी बाजार समीर नलावडे मित्रमंडळ आणि भाजपाचे सर्व नगरसेवक यांच्या संयोजनातून भरवला जाणार आहे. गतवर्षी दिवाळी बाजारात मोठी उलाढाल झाली होती. त्यामुळे बचतगटातील महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला होता. त्यामुळे यावर्षीही पुन्हा कणकवली बसस्थानकाच्या लगतच्या पेट्रोल पंपासमोर महामार्ग उड्डाणपुलाखाली दिवाळी बाजार भरवला जाणार आहे.एकूण ३५ विविध प्रकारचे स्टॉल लावले जाणार आहेत. स्टॉल मध्ये टेबल, खुर्ची आणि विजेची व्यवस्था मोफत केली जाणार आहे. बाजारात प्लास्टिक आकाश कंदील विकता येणार नाहीत. या दिवाळी बाजारात सहभागी होण्यासाठी स्टॉल बुकिंग आवश्यक असून माजी नगराध्यक्षा मेघा गांगण यांच्याशी संबंधितांनी संपर्क साधावा असे आवाहनही समीर नलावडे यांनी यावेळी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग