शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी वायरमन विद्युत खांबावरून कोसळला 

By अनंत खं.जाधव | Updated: June 7, 2024 21:23 IST

सावंतवाडीतील घटना : रूग्णालयात दाखल 

सावंतवाडी : विजेच्या खांबावरून कोसळल्यामुळे सावंतवाडीत वायरमन घननिल मिशाळ(27) हा जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास येथील मच्छी मार्केट परिसरात असलेल्या इको बँकसमोर घडली. 

मिशाळ यांना तातडीने अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो येथील मच्छी मार्केट परिसरात ट्रांसफार्मर वर चढून काम करत होता, दरम्यान अचानक तो खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ रिक्षात घालून कुटीर रुग्णालय हलविले.

दरम्यान घडल्या प्रकारानंतर विद्युत अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर तसेच रूग्णालयात धाव घेतली घननिल हे कंत्राटी वायरमन असून त्यांना विजेच्या पोलवर चढल्यावर शाॅक आला आणि ते खाली कोसळले असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले त्यांनी संरक्षक कपडे घातले नव्हते असे ही दिसून येते पावसाळ्यात खास असे संरक्षक किट वापरण्यात यावे असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.दरम्यान मिशाल यांची प्रकृती सुधारत असून घटनेनंतर अधिकारी कर्मचारी रूग्णालयात दाखल होत त्याला धीर दिला.

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडी