सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ९९ शाळकरी विद्यार्थी हृदयरोगाने, किडनी, अपंगत्व यांसारख्या दुर्धर आजाराने पीडित असल्याची धक्कादायक बाब आरोग्य विभागाच्या सर्व्हेदरम्यान उघडकीस आली आहे. दरम्यान, या मुलांवर योग्य ते उपचार करण्याबाबतची कार्यवाही करा, असे आदेश महिला व बालविकास सभापती स्नेहलता चोरगे यांनी दिले.जिल्हा परिषदेची महिला व बालविकास समितीची सभा सभापती स्नेहलता चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी समिती सदस्या निकिता परब, निकिता तानवडे, वंदना किनळेकर, रुक्मिणी कांदळगावकर, रत्नप्रभा वळंजू, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील दुर्धर आजाराने पीडित असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा आढावा सभागृहात घेण्यात आला. (प्रतिनिधी)
९९ विद्यार्थ्यांना दुर्धर आजार
By admin | Updated: November 21, 2014 21:45 IST