शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सौरकुंपणास ९० टक्के अनुदान

By admin | Updated: July 1, 2016 23:40 IST

दीपक केसरकर : हेवाळे, बाबरवाडीत हत्ती नुकसानग्रस्त भागाची पाहणी

दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे नुकसान करणाऱ्या जंगली हत्तींच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना सौरकुंपणासाठी ९० टक्के अनुदान देण्याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन राज्याचे वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हेवाळे पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नाबार्डमधून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. शुक्रवारी पालकमंत्री केसरकर यांनी तिलारी खोऱ्यातील हेवाळे, बाबरवाडी परिसरात उपद्रव माजविणाऱ्या जंगली हत्तीबाधित क्षेत्राचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, गणेशप्रसाद गवस, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र म्हापसेकर, हेवाळे गावचे सरपंच संदीप देसाई उपस्थित होते. सर्वप्रथम पालकमंत्री केसरकर यांनी हत्ती नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी सरपंच संदीप देसाई व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. हत्तीबाधितांना तातडीने नुकसानभरपाई दिली जाईल. त्याचबरोबर हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी खंदक खोदले जातील. या व्यतिरिक्त शेतीच्या संरक्षणासाठी सौरकुंपण घालण्याकरिता शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन पालकमंत्री केसरकर यांनी दिले. (प्रतिनिधी)हेवाळे पुलासाठी नाबार्डमधून निधी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हेवाळे पुलाचीही ग्रामस्थांसह पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने सरपंच संदीप देसाई यांनी पालकमंत्र्यांना पुलाच्या बांधकामाबाबत निवेदन दिले. नाबार्डच्या योजनेमधून पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी गावकऱ्यांना दिले.