शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

७९ गावांवर दरडीची टांगती तलवार

By admin | Updated: June 23, 2015 00:42 IST

यंत्रणा खडबडून जागी : बचावकार्यासाठी सक्षम यंत्रणाच नाही, आपत्कालीन यंत्रणेच्याही मर्यादा उघड...

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील डोंगर पाण्याने फुगले असून शनिवारी रात्री रत्नागिरीतील शिरगाव बाणेवाडीतील घरावर दरड कोसळून घराच्या भिंतीखाली सापडून माय-लेकीचा अंत झाला. सोमवारी पहाटे दापोली तालुक्यातील दाभोळ येथे दरडीखाली तीन घरे गाडली गेली. या दोन घटनांमुळे जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात दरडी कोसळण्याची संभाव्यता असलेल्या ७९ गावांतील ग्रामस्थ या घटनांनी हादरले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे मात्र बचाव कार्यासाठी सक्षम यंत्रणाच नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यात भूवैज्ञानिक स्तरावर सर्वेक्षण झालेली अशी १६ गावे असून दरड कोसळण्याची शक्यता असलेली आणखी ६३ गावे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ७९ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. भूवैज्ञानिक स्तरावर सर्वेक्षण झालेल्या गावांमधीलच दाभोळ या गावात सोमवारी पहाटे दरड कोसळली. भूवैज्ञानिक स्तरावर दरड कोसळण्याची संभाव्यता असलेल्या ज्या सोळा गावांची यादी करण्यात आली आहे त्यात आज दरड कोसळलेल्या दाभोळ गावाचाही समावेश आहे. तसेच या १६ गावांमध्ये दापोली तालुक्यातील उंबरशेत, कोंडगाव हवेली, कडुक खुर्द, कोळबांद्रे, खेड तालुक्यातील खोपी, रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे, चांदेराई, चिंद्रवली, लांजा तालुक्यातील निवसर, खोरनिनको, असोडे, राजापूर तालुक्यातील हसोळ गोपाळवाडी, शिवणे बुद्रुक, वडद हसोळ, संगमेश्वमधील रामपेठ या गावांचा समावेश आहे. ज्या गावांचे भूवैज्ञानिक स्तरावर सर्वेक्षण झालेले नाही, परंतु ज्या गावांत डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांना, घरांना धोका आहे, अशा ६३ गावांची यादी जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय धोकादायक गावे पुढीलप्रमाणे : दापोली-हर्णै, मुरूड, कर्दे, पाजपंढरी, बुरोंडी, करंजगाव, लाडघर, केळशी. खेड-खेड शहर, चिंचघर, प्रभूवाडी, सुसेरी, देवघर, वडगाव बुु., तळवट खेड, धामणंद, वेरळ, चोरवणे, निळवणे, शिरगाव. संगमेश्वर तालुका-कोळंबे, पांगेरी, कसबा, साखरपा आंबाघाट. चिपळुण-पोफळी, कोंडफणसवणे, अडरे, अनारी, वीर, काळुस्ते खुर्द, केतकी, करंबवणे, विवली, मालदोली, भिले, तिवरे, गोवळकोट, कोळकेवाडी, मुंडेतर्फ चिपळुण, पिंपरी बुद्रुक, कुंभार्ली, नागावे, शिरगाव.गुहागर-कातळे नवानगर, पडवे, तवसाळ खुर्द, घरटवाडी तर्फे वेरळ, धोपावे, नवानगर, पाचेरी सडा, पाचेरी आगर, भातगाव, असुरे, आंबेरे खुर्द. मंडणगड-गोवेळे, शेनाळे, चिंचाळी, कोंडगाव, देऊनगरी, वाल्मिकीनगर, नारायणनगर, बाणकोट, साखरी. (प्रतिनिधी)उपाययोजनाच नाहीत?बाणेवाडी, दाभोळ घटनांती प्रशासन खडबडून जागे.बचाव कार्यासाठी सक्षम यंत्रणाच नसल्याची चर्चा.दरडी कोसळण्याची संभाव्यता असलेल्या ७९ गावांतील ग्रामस्थ या घटनांनी हादरले.भूवैज्ञानिक स्तरावर सर्वे झालेली १६ गावे.दरड कोसळण्याची शक्यता असलेली आणखी ६३ गावे.जिल्ह्यातील १६ गावांतील दरडी कोसळण्याची संभाव्यता असल्याबाबत भूवैज्ञानिक स्तरावर सर्वे झाला आहे. उर्वरित ६३ गावांनाही दरडी कोसळण्याचा धोका आहे. या गावांत अशा घटना घडू नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या गेलेल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असा सवाल होत आहे.दरडींमुळे धोका असलेल्या गावांची तालुकावार संख्यादापोली१३खेड१३रत्नागिरी३लांजा३राजापूर३संगमेश्वर५चिपळुण१९गुहागर११मंडणगड९जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी दरडींचा धोका आहे. मात्र प्रशासन नोटीस पाठवण्यापलिकडे काहीच करत नाही तर दुसरीकडे स्थानिक घर सोडण्यास तयार नसल्याने प्रश्न जैसे थे आहे.