शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

जिल्ह्याचे ७ टक्के पाणी दूषित

By admin | Updated: January 29, 2015 23:43 IST

रत्नागिरी जिल्हा : आरोग्य विभागाच्या पाणी शुध्दीकरणाच्या सूचना

रत्नागिरी : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या पाणी नमुने तपासणीमध्ये जिल्ह्यातील ७ टक्के पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे़ हे पाणी शुध्दिकरणाच्या सूचना आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतींना दिली आहे़अशुध्द पाण्यामुळे अनेक आजार पसरतात़ त्यामुळे साथींच्या आजारांचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते़ त्यासाठी पाणी गाळून, शुध्द करुन तसेच गरम करुन प्यावे, अशी जनजागृती गावोगावी आरोग्य विभागाकडून करण्यात येतो़ तसेच पाणी शुध्दिकरणासाठी तुरटी, मेडिक्लोरचा वापर करण्यात येतो़ दर महिन्यात असा अहवाल तयार केला जातो. यासाठी सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याच्या स्रोताचीही तपासणी केली जाते. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात अशुध्द पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरीही ग्रामीण भागातील अनेक स्त्रोत हे अजूनही दुषित आहेत. त्यांना पाणी शुध्दीकरणाबाबतच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.आरोग्य विभागाकडून पाणी तपासणी प्रत्येक महिन्यात करण्यात येते़ त्यासाठी विहिरी, तलाव, नळपाणी योजना व पाणी पुरवठ्याच्या अन्य साधनांतून पाण्याचे नमुने ग्रामपंचायत तसेच आरोग्य केंद्रांमार्फत गोळा करण्यात येतात़ मागील महिन्यात जिल्हाभरातून पाण्याचे २२७३ नमुने गोळा करण्यात आले होते़ त्यांची तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात आली़ त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून, पाण्याचे १५५ नमुने म्हणजेच ७ टक्के पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे़ ही दूषित पाण्याची आकडेवारी पाहता इतर जिल्ह्यांपेक्षा फार कमी आहे आणि या दुषित पाण्याबाबतही उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात निर्मल ग्रामपंचायतींचे प्रमाणही जास्त असल्याने दूषित पाण्याचे प्रमाण कमी आहे़ (शहर वार्ताहर)तालुकादूषित पाण्याचीटक्केवारीमंडणगड१४दापोली५खेड९गुहागर३चिपळूण६संगमेश्वर५रत्नागिरी११लांजा८राजापूर६एकूण६७