शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाटीलकीविना ६८ गावे...

By admin | Updated: April 13, 2016 00:11 IST

जिल्ह्यातील स्थिती : अतिरिक्त भार नजिकच्या गावातील पाटलांवर

गिरीश परब -- सिंधुदुर्गनगरी --पोलिस पाटील भरती प्रक्रिया न राबविली गेल्याने सिंधुदुर्गातील तब्बल ६८ गावे पोलिस पाटील पदाविना शिल्लक राहिलेली आहेत. त्यामुळे या गावचा अतिरिक्त भार नजिकच्या गावातील पोलिस पाटलांवर पडलेला आहे. गावकीच्या राजकारणामध्ये पोलिस पाटलांना गावच्या पाटलाचा दर्जा असल्यामुळे या पदाला मोठा मान आहे. प्रशासन व गावकऱ्यांमधील दुवा म्हणून पोलिस पाटलांची ओळख आहे. ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी पोलिस पाटलावर असते. पूर्वीपासून गावागावात ही पदे कार्यरत आहेत. विशेषकरून पोलिस खाते, तहसीलदार यांच्याशी या पदाचा जवळचा संबंध येतो. गावागावातील कायदा व सुव्यवस्था, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पुरवणे, गावच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना कळविणे, पोलिसांना गुन्ह्याच्या चौकशीत मदत करणे, नैसर्गिक आपत्तींची माहिती तहसिलदारांना कळविणे, गावच्या हद्दीत कोणी विनापरवाना शस्त्र बाळगल्यास ते काढून घेणे, अशी कामे पोलिस पाटलांवर सोपविण्यात आलेली आहेत. सिंधुदुर्गाचा विचार केला तर सावंतवाडी, कुडाळ व कणकवली या तीन उपविभागामध्ये एकूण पोलिस पाटलांच्या ४६२ मंजूर पदांपैकी ३९४ पदेही भरण्यात आलेली आहेत. यातील काही पदांसाठी जाहिरनामा काढण्यात आला आहे. मात्र त्याची पुढील कार्यवाही होताना दिसून येत नाही. या रिक्त पदांमध्ये दोन ठिकाणच्या गावातील पोलिस पाटलांना बडतर्फ तर पोलिस पाटलांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर वैभववाडीमध्ये एक पद न्यायप्रविष्ठ राहिले आहे. आरक्षणानुसार उमेदवारच नाहीतजिल्ह्यातील रिक्त ६८ पदांपैकी ४१ रिक्त पदे भरतीचा जाहिरनामा होता. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. सदयस्थितीत प्रशासनाच्या रेकॉर्डला ६८ गावांमध्ये पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत. भरती प्रक्रिया राबवूनही या पदांसाठी विशिष्ट आरक्षण पडल्याने व त्या ठिकाणी उमेदवार नसल्याने हे पद अखेर रिक्त राहिले आहे.दोन पोलिस पाटलांना केले बडतर्फसावंतवाडी उपविभागातील दोन गावामधील पोलिस पाटलांना प्रशासनाने बडतर्फ केले आहे. कामात अनियमितता असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तर ७ पोलिस पाटलांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १० पोलिस पाटील मयत झाल्यानने पदे रिक्त राहिली आहेत.