शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दर लाखामागे ५३ कुष्ठरूग्ण

By admin | Updated: January 30, 2015 23:18 IST

रत्नागिरी जिल्हा : रोगनिर्मूलनासाठी आरोग्य विभाग राबविणार विशेष मोहीम

रत्नागिरी : जिल्ह्यात कुष्ठरूग्णांचे प्रमाण दरहजारी ०.५३ इतके असून, आधीचे एकूण रूग्ण ९० आहेत. लहान मुलांचे प्रमाण ७.४६ टक्के आहे. तसेच नवीन कुष्ठरूग्णांची संख्या ६४ असून, हे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे ३.३८ टक्के इतके आहे. एप्रिल २०१४ पासून आतापर्यंत विकृतीचे प्रमाण २.९९ टक्के आहे. जिल्ह्यात या रोगाचे प्रमाण कमी असले तरी पूर्णत: निर्मूलन होण्यासाठी ३० जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहीम राबवली जाणार असल्याची, माहिती आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा कुष्ठरोग सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ३० जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत तालुका कुष्ठरोग निवारण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद घेण्यात आली. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या मोहीमेला प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी या विभागाचे सहायक संचालक बी. एस. ठोंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र खंडाळकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनीत फाळके, श्रीकांत कुलकर्णी व कर्मचारीवर्ग उपस्थित होता. जिल्ह्यात कुष्ठरूग्णांचे प्रमाण कमी आहे. मात्र, आहे ते प्रमाण दरहजारी एकपेक्षा कमी करणे, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती ठोंबरे यांनी दिली. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, मंडणगड, दापोली या चार तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान १६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत प्रत्यक्ष सर्वेक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा, स्वयंसेविका, तसेच बरा झालेला कुष्ठरूग्ण अथवा स्वयंसेवक यांच्या पथकांमार्फत या चार तालुक्यांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. मोहिमेपूर्वी तालुक्यात कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच युवावर्ग, युवा मंडळे, बचत गट, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य यांची विविध स्तरावर कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरदेखील मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. या उपक्रमांतर्गत एकही रूग्ण उपचाराविना राहता कामा नये, यासाठी लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. याकरिता छोट्या छोट्या गावांमध्ये जास्तीत जास्त शिबिरे घ्या, जोडीने कुष्ठरोगाबाबत माहिती देणारा निर्मुलनाचा कार्यक्रम आयोजित करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी यावेळी दिल्या. (प्रतिनिधी)कुष्ठरूग्ण निवारण मोहिमेत, समाजात असलेले कुष्ठरूग्ण स्वत:हून पुढे यावेत. या मोहिमेद्वारे जास्तीत जास्त कुष्ठरूग्ण शोधून काढण्यात येणार आहेत. विकृती प्रतिबंध, वैद्यकीय पुनर्वसनांतर्गत नवीन व जुन्या रूग्णांना सेवा व सल्ला देण्यात येणार आहे. कुष्ठरोगाविषयी समाजात असलेले गैरसमज अथवा भीती दूर करण्यासाठी जागृती करण्यात येणार आहे. समाजामध्ये कुष्ठरूग्णांचा सहभाग वाढवण्याचा प्रमुख उद्देश आहेत.जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण चिपळूण तालुक्यात असून, सर्वात कमी दापोली तालुक्यात आहेत.जिल्ह्यात या रोगाने ग्रस्त झालेल्या मुलांची एकूण संख्या ४ असून, चिपळूण, दापोली, लांजा आणि मंडणगड येथे प्रत्येकी एक रूग्ण आहे. महिलांची एकूण संख्या २३ आहे. यांपैकी दापोली, गुहागर, मंडणगड येथे प्रत्येकी एक; लांजा, राजापूर येथे प्रत्येकी दोन आणि चिपळूण, खेड, रत्नागिरी आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी चार अशी आहे.एप्रिल ते डिसेंबर २०१४ अखेर कुष्ठरूग्णांची एकूण संख्या तालुकाआधीचेनवीनएकूणमंडणगड०८०७१५दापोली०५०३०८खेड१४१२२६चिपळूण१९११३०गुहागर०९०६१५संगमेश्वर०९०७१६रत्नागिरी१५०८२३लांजा०५०५१०राजापूर््०६०५११एकूण९०६४१५४आधारक्रमांक नोंदणी, नवीन आधारकार्ड वपॅन कार्ड सुविधेचा लाभ घेणाऱ्यांची संख्यासद्यस्थितीसंसर्गिकअसंसर्गिक एकूणरूग्णरूग्णउपचाराखालील रूग्ण१२३३११५४आधीचे रूग्ण७३१७९०नवीन ५०१४६४रोगमुक्त५११४६५