शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: 'आंबा बागायतदारांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी'

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 14, 2024 17:49 IST

आंबा, काजू उत्पादक बागायतदार संघाच्या वेंगुर्ला येथील बैठकीत मागणी

वेंगुर्ला : सततच्या अतिउष्णतेमुळे आंबा फळांवर मोठ्या प्रमाणावर चट्टे आल्याने अशा फळांची विक्री होऊ शकली नाही. थ्रीप्स रोग व फळमाशीच्या प्रादुर्भावामुळेही आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. परिणामी यावर्षी केवळ ३५ ते ४० टक्के उत्पादन आंबा उत्पादकांना मिळाले. त्यामुळे आंबा बागायतदारांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी आंबा व काजू उत्पादक बागायतदार संघाच्या बैठकीत करण्यात आली.वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात आंबा काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक झाली. यावेळी संघाचे सचिव ॲड. प्रकाश बोवलेकर, पदाधिकारी किशोर नरसुले, शिवराम आरोलकर, सदानंद पेडणेकर, रत्नदीप धुरी, सुरेश धुरी, स्वप्नील शिरोडकर, सदाशिव आळवे व यशवंत उर्फ आबा मठकर उपस्थित होते.यावर्षी आंबा बागायतदारांना फळमाशीचा त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला. प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने सूचविलेल्या रक्षक सापळ्यांनाही आता ही फळमाशी दाद देत नाही. फळमाशी फळांना डंख करून ते फळ प्रदूषित करते. फळमाशीने डंख केलेले फळ डागाळत असल्याने ते विक्रीसाठी योग्य नसते. प्रादेशिक फळ संशोधन केंद्रांने यावर कायमस्वरूपी उपाय शोधावा, अशी मागणी बागायतदारांनी केली. आभार शिवराम आरोलकर यांनी मानले.

वन्यप्राण्यांवर हल्ल्याची शक्यताशेकरूसोबत वेंगुर्ल्यासारख्या भागात आता लाल तोंडाची माकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. दोन्ही प्राणी नारळ व काजू पिकांचे अतोनात नुकसान करत आहेत. मोठ्या मेहनतीने तयार केलेले उत्पादन निसर्गाच्या लहरीपणाबरोबरच आता जंगली प्राण्यांमुळेही धोक्यात आले आहे. याकडे शासनाने आता तरी गांभीर्याने पाहावे. अन्यथा, आतापर्यंत शांत असलेल्या शेतकऱ्यांकडून संतापाच्या भरात या वन्य प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता आहे.

बागायदारांनी फळबागा रोगमुक्त कराव्यातवेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे रोग शास्त्रज्ज्ञ डॉ. यशवंत गोवेकर व कनिष्ठ कीटक शास्त्रज्ज्ञ डॉ. वैशाली झोटे यांनी फळमाशी व अन्य रोगांच्या नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. रक्षक सापळा परिसरातील सर्व बागांमध्ये लावला गेला तरच फळमाशीवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. सर्व बागायतदारांनी रक्षक सापळ्याचा उपयोग करावा, रोटा व अन्य कीड रोगांच्या नियंत्रणासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात असलेली औषधे परिणामकारक आहेत. बागायतदारांनी आमच्याशी संपर्क साधून आपल्या बागा रोगमुक्त कराव्यात, असे आवाहन डॉ. गोवेकर यांनी बैठकीत केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMangoआंबा