शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेच्या एकूण अंदाजपत्रकापैकी ५ टक्के निधी महिला व बाल विकासावर खर्च आवश्यक

By admin | Updated: April 17, 2017 18:43 IST

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या सूचना

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. १७: नगरपालिकेच्या एकूण अंदाजपत्रकापैकी (बजेट) ५ टक्के निधी हा त्या नगरपालिकेच्या क्षेत्रातील महिला व बाल विकासावर खर्च करणे बंधनकारक आहे. या दृष्टिकोनातून सर्व जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतीकडून अहवाल घ्यावा व पुढील बैठकीत सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, महिला जिल्हा सल्लागार समिती यांनी आज दिली.महिला जिल्हा सल्लागार समितीची सभा जिल्हाधिकारी शेजारील दालनात झाली. या सभेत महिला व बालकांविषयक विकास योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील अंकुर महिला वसतिगृहास भेट देण्याची मागणी समितीच्या अशासकीय सदस्यांनी केली. याबाबत महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांनी सदर भेटीच्या कार्यक्रमाचे नियोजन करावे तसेच समितीच्या बैठक नियमित तीन महिन्यातून एकदा होण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्याची सूचनाही चौधरी यांनी यावेळी केली.या बैठकित महिला व बाल कल्याणाच्या योजना, महिला व आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा ग्रामीण विकास संस्था यांचेकडील योजना, कौंटुबिक हिंसाचार, महिला संरक्षण अधिनियम २००५ बाबतची कार्यवाही आदी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत चर्चेत अशासकीय सदस्य महिला व बाल विकास सभापती सायली सावंत, प्रज्ञाताई परब, सुगंधा साटम, प्रा. प्रज्ञा नायगांवकर, डॉ. प्रतिभा नाटेकर यांनी भाग घेतला. अ‍ॅड. खानोलकर, मविमचे कांबळे, महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले, संजय पवार, बाळकृष्ण सावंत, महाले, प्रा. राघवेंद्र कदम, भुजंग भोसले आदी उपस्थित होते.