शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईवरून जोरदार खडाजंगी, सावंतवाडीला ४६ कोटींची पाणी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:30 IST

Sawantwadi Sindhdurgnews- सावंतवाडी शहरात ऐन मार्च महिन्यात होणाऱ्या पाणीटंचाईवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मात्र नगराध्यक्ष संजू परब यांनी वेळीच यात हस्तक्षेप करत सावंतवाडी शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून, त्यासाठी ४६ कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगितले. मात्र शिवसेना सदस्यांनी नियमबाहय नळ कनेक्शन्स दिली आहेत का, याची चौकशी करण्यासाठी समिती नेमा अशी मागणी केली. त्याला नगराध्यक्षांनी मंजुरी दिली.

ठळक मुद्देपाणीटंचाईवरून जोरदार खडाजंगी, सावंतवाडीला ४६ कोटींची पाणी योजना चौकशी समिती नेमण्याची मागणी

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात ऐन मार्च महिन्यात होणाऱ्या पाणीटंचाईवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मात्र नगराध्यक्ष संजू परब यांनी वेळीच यात हस्तक्षेप करत सावंतवाडी शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून, त्यासाठी ४६ कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगितले. मात्र शिवसेना सदस्यांनी नियमबाहय नळ कनेक्शन्स दिली आहेत का, याची चौकशी करण्यासाठी समिती नेमा अशी मागणी केली. त्याला नगराध्यक्षांनी मंजुरी दिली.सावंतवाडी नगरपालिकेची मासिक बैठक नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, राजू बेग, नासिर शेख, सुरेंद्र बांदेकर, डॉ. जयेंद्र परूळेकर, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, नगरसेविका शुभांगी सुकी उपस्थित होते.नगरपालिकेची मासिक बैठक सुरुवातीला खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

मात्र आयत्या वेळच्या विषयात नगरसेविका लोबो यांनी सावंतवाडीत जुनाबाजार, सालईवाडा, समाजमंदिर परिसरात ऐन मार्च महिन्यात पाणीटंचाई कशी भासते, असा सवाल करत या पाणीटंचाईमागे कोण आहे? तुम्हाला बदनाम करण्यासाठी ही पाणीटंचाई करण्यात आली आहे का? असा सवाल केला.तसेच या पाणी टंचाईची चौकशी करण्याची मागणी केली. यावरून नगरसेवक नासिर शेख व सुधीर आडिवरेकर यांनी, तुमच्या काळापासून ही पाणीटंचाई आहे, मग तेव्हा गप्प का होता? असा सवाल करत, प्रत्येकवेळी चौकशीची मागणी करता, मग तुमच्या काळात काय केले? असा सवाल केला. तसेच लोबो व बांदेकर यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर दिले. यावरून शिवसेना व भाजपच्या नगरसेवकामध्ये चांगलीच खडाजंगी झाली.नगराध्यक्षांनी सदस्यांना केले शांतअखेर यामध्ये नगराध्यक्ष संजू परब यांनी सर्वच नगरसेवकांना शांत करत, मी स्वत: नगराध्यक्ष झाल्यापासून सावंतवाडीतील पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून नव्या नळपाणी योजनेसाठी पाठपुरावा करत होतो. त्याला जीवन प्राधिकरणने तांत्रिक मंजुरी दिली असून, ४० कोटी खर्चाची योजना तयार करण्यात येणार आहे. त्यात ६ कोटी रुपये सावंतवाडी नगरपालिका देणार असून, एकूण ही ४६ कोटीची योजना असणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगत सर्व सदस्यांना शांत केले, तर चराठे माजगाव ग्रामपंचायतींना नगरपालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याला आणखी ९० दिवसांची मुदत वाढवून दिल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. 

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग