शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोटेत वायूगळती ३९ जणांना बाधा

By admin | Updated: March 24, 2017 23:31 IST

दोन महिला गंभीर : गोदरेज कंपनीत दुर्घटना

आवाशी : लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत रासायनिक वायू गळतीची मालिका मागील सहा महिन्यांपासून सुरूच आहे. गुरुवारी रात्री येथील गोदरेज अ‍ॅग्रोवेट लिमिटेड या कंपनीत झालेल्या वायू गळतीत वसाहतीलगतच्या वस्तीतील ३९ जणांना वायूची बाधा झाली आहे. त्यामध्ये दोन महिलांची प्रकृती गंभीर आहे.कंपनीतील दुसऱ्या पाळीत डिस्टेलेशनचे काम सुरू असताना रिअ‍ॅक्टरच्या काचेला तडा गेला व आतून वायू बाहेर पडून आसपास पसरला. त्याची गुणदे-तलपीवाडी येथील ३६ ग्रामस्थांसह कंपनीतील तीन कामगारांना वायूची बाधा झाली. कंपनीत हार्बोसाईड या तणनाशकाचे उत्पादन घेतले जाते. यासाठी ढोलवीन, एमएसबीडी, सोडियम क्लोराईड हा कच्चा माल वापरला जातो. गुरुवारी रात्री बाष्पीभवनाचे काम सुरू असताना येलवीन वायूच्या रिअ‍ॅक्टरच्या काचेला अचानक तडा गेला व त्यातून गळती झाली. यावेळी कंपनीत २१ कामगार काम करीत होते.या वायूगळतीत कंपनीचे ठेकेदारी कामगार अक्षय घाग (सोनगाव), रवींद्र खळे व संकेत खसासे यांना वायूची बाधा झाली, तर तलारीवाडीतील मंदार संतोष खरात (वय ३१), शेहिमा बवा (४०), रुबी खातीम (४०), जनाबाई खरात (६५), देवकी खरात (६५), रंजना खरात (४५), अरुणा घाडगे (३७), धनश्री खरात (२१), हनुमंत चव्हाण (५५), विकी गुप्ता (१४), रुतिझा आखाडे (१०), श्रावणी आखाडे (३), यश आखाडे (६), रेश्मी आखाडे (२६), मंदा शेंडे (३५), मुन्ना अरविंद (२०), पांडुरंग खरात (५४), शशिकांत गाडगीळ (४३), नितीन बावधाने (३०), शैलेश आखाडे (१४), अक्षय फाकडे (११), रमेश आखाडे (४३), अश्विनी खरात (१८), प्रथम खरात (७), सिया खरात (५), बिनबल यादव (४५), अमित चव्हाण (२५), रहिमिय्या हुसैन (२७), सानिका वरळ (२५), सूरज पवार (२५) यांना वायूची बाधा झाली. यापैकी देवकीबाई सखाराम खरात (८०), मंदा शेंडे (३५) यांना अधिक उपचारांसाठी चिपळुणातील खासगी रुग्णालयात, तर इतरांना येथीलच परशुराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिपळूण येथील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या अपघातात संपूर्ण तलारीवाडीला वायूची बाधा झाल्याने येथील वस्तीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (वार्ताहर)