शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
2
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
3
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
4
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
5
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
6
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
7
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
8
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
9
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
10
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
11
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
12
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
13
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
14
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
15
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
16
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
17
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
18
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
19
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
20
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक

सिंधुदुर्गात ३८ जणांचे अर्ज दाखल

By admin | Updated: September 28, 2014 00:18 IST

बहुरंगी लढतीची शक्यता : सावंतवाडीत सर्वाधिक १६ उमेदवारांचे अर्ज

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण २६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जागांसाठी आता ३८ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांत बहुरंगी लढती होणार आहेत.आज अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये कुडाळ मतदारसंघातून उद्योगमंत्री नारायण राणे, कणकवली मतदारसंघातून आमदार प्रमोद जठार, काँग्रेसतर्फे नीतेश राणे यांच्यासह सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेकडून माजी आमदार दीपक केसरकर, काँग्रेसतर्फे बाळा गावडे, राष्ट्रवादीतर्फे सुरेश दळवी यांचा समावेश आहे. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही मतदारसंघांत आज काँग्रेस, शिवसेना व भाजपच्या उमेदवारांनी मिरवणुकांतून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. कणकवलीत १३ उमेदवारकणकवली मतदारसंघातून काँग्रेसतर्फे नीतेश राणे यांनी मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्योगमंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत, आदी उपस्थित होते. त्याअगोदर भाजपतर्फे आमदार प्रमोद जठार यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी भगवती मंगल कार्यालयात मेळावा घेतला. मेळाव्यानंतर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली होती. त्यानंतर शिवसेनेतर्फे सुभाष मयेकर आणि राष्ट्रवादीतर्फे अतुल रावराणे यांनी अर्ज दाखल केला. अपक्ष आणि राष्ट्रवादीचे बंडखोर म्हणून डॉ. अभिनंदन नीळकंठ मालंडकर, बसपतर्फे चंद्रकांत आबाजी जाधव, भाजपतर्फे डमी उमेदवार संजय पाताडे, अपक्ष म्हणून सुजित सुधाकर तावडे, अपक्ष म्हणून विश्वनाथ विष्णू पडेलकर यांनी आज अर्ज दाखल केले. कणकवली मतदारसंघात आतापर्यंत १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.सावंतवाडीत १६ उमेदवारसावंतवाडी मतदारसंघातून आज अकराजणांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघात आतापर्यंत १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सावंतवाडी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुरेश दळवी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे परशुराम उपरकर, शिवसेनेतर्फे दीपक केसरकर, भारतीय जनता पक्षाचे राजन तेली, राष्ट्रीय काँग्रेसतर्फे चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे सुपूर्द केले. सहाजणांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. (प्रतिनिधी)सावंतवाडी, कणकवलीत पंचरंगी, कुडाळात चौरंगीची शक्यतासावंतवाडी मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि मनसे या प्रत्येक प्रमुख पक्षाचा एक उमेदवार रिंगणात असल्याने तर कणकवलीतही प्रमुख चार पक्षांसह अपक्ष म्हणून विजय सावंत यांनी अर्ज दाखल केल्याने येथे पंचरंगी लढत होईल, तर कुडाळमध्ये सर्व प्रमुख चार पक्षांमध्ये चौरंगी लढत होणार आहे. कु डाळ मतदारसंघातून काँग्रेसतर्फे नारायण राणे, भारतीय जनता पक्षातर्फे विष्णू मोंडकर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुष्पसेन सावंत व शिवसेनेतर्फे वैभव नाईक यांनी अर्ज दाखल केले आहेत. अपक्ष म्हणून तीन उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत.