शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

किनारपट्टीवर ३६ तास सागर सुरक्षा कवच

By admin | Updated: November 18, 2015 00:05 IST

मोहिमेस आजपासून सुरुवात : मालवण किनारपट्टी व सागरी मार्ग सील

मालवण : महाराष्ट्र किनारपट्टीवर सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सुरक्षा दलातर्फे राबवण्यात येणारी सागर सुरक्षा कवच मोहीम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर बुधवार १८ रोजी सकाळी ६ ते गुरुवारी सायंकाळी ६ या ३६ तासाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी मालवण, आचरा येथील पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. ८ अधिकाऱ्यांसह ९० कर्मचाऱ्यांची टीम मालवण किनारपट्टी व सागरी मार्ग सील करणार आहेत. दोन टॉवरच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जाणार असून दिवसरात्र पोलिसांची गस्त व नाका बंदी याठिकाणी राहणार आहे. सुरक्षेचे प्रात्यक्षिक म्हणून ही मोहीम वर्षातून दोन ते तीन वेळा राबवली जाते. या मोहिमेत कोस्टगार्ड, बंदर, नेव्ही व महसूल तसेच पोलिसांची रेड टीम आणि ब्लू टीम या मोहिमेत सहभागी होतात. देशातील सर्वाधिक मोठ्या अशा दहशतवादी हल्ल्यांपैकी असा २६/११ चा हल्ला समुद्रीमार्गे दहशतवाद्यांनी घडवला. त्यानंतर किनारपट्टीवरील सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी ही मोहीम राबवली जाते. मालवण प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम व आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टीम सज्ज झाली आहे. (प्रतिनिधी)सहकार्याचे आवाहन४किनारपट्टीवर तसेच रस्त्या-रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. ४तोंडवली व आचरा किनारपट्टीवर टॉवर, समुद्रात स्पीड बोट तसेच जीप, मोटारसायकल गस्त राहणार आहे.४नाकाबंदी दरम्यान वाहनचालकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. पोलिसांचीच रेड टीम ही ब्लू टीमची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करणार आहे. मालवण तालुक्यात ८ अधिकारी व ९० पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.