शहरं
Join us  
Trending Stories
1
'संशयित आरोपी जरांगेंचे कार्यकर्ते'; या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची धनंजय मुंडेंची मागणी
2
भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
3
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
4
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
6
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
7
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
8
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
9
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Supreme Court: भटक्या कुत्र्यांवरील निर्णय ऐकून महिला वकील कोर्टातच ढसाढसा रडली, म्हणाली...
11
‘काँग्रेसम्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद 
12
घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?
13
Lenskart IPO: लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
14
Samudra Shastra: दातात फट असणारे श्रीमंत असतात? दाताच्या ठेवणीवरून वाचा भाकीत!
15
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
16
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेशी महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
17
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
18
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
19
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
20
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल

सिंधुदुर्गनगर जिल्ह्यात ३५८ कुपोषित बालके--महिला व बालविकास समिती सभेत माहिती उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 22:30 IST

सिंधुदुर्गनगरी : कुपोषण मुक्तीसाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यानेही कुपोषणमुक्त जिल्हा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत

ठळक मुद्दे ३२ तीव्र : या ३५८ मुलांचे श्रेणी संवर्धन करण्यासाठी महिला व बालविकास आणि आरोग्य विभागच्या मदतीने प्रयत्न सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : कुपोषण मुक्तीसाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यानेही कुपोषणमुक्त जिल्हा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. असे असले तरी जिल्ह्यात ३५८ कुपोषित बालके असून, यात ३२ ही तीव्र कुपोषित (सॅम), तर ३२६ बालके ही कुपोषित (मॅम) असल्याची धक्कादायक माहिती बुधवारी महिला व बालविकास समिती सभेत उघड झाली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्तीचे स्वप्न भंगले आहे.

गरोदर मातांना पुरेसा पोषण आहार न मिळणे, तसेच लहान मुलांना योग्य तो आहार न मिळाल्याने त्यांच्या वजनात घट होऊन ही बालके कुपोषित श्रेणीत जातात. देशातील कुपोषण दूर करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना आखल्या जात आहेत. राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण कमी असले तरी जिल्हा प्रशासन आणि शासन लहान मुलांना पोषण आहार देऊन कुपोषणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. याशिवाय जिल्हा परिषदेनेही जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.त्यासाठी जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग आपले सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अंगणवाड्यांमधून या लहान मुलांना पोषण आहार दिला जात आहे.

असे असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५८ कुपोषित बालके असल्याची माहिती बुधवारी महिला व बालविकास समिती सभेत देण्यात आली. यात ३२ बालके ही ‘सॅम’ श्रेणीत तर ३२६ ही ‘मॅम’ श्रेणीत आहेत. यात वैभववाडीमध्ये ‘मॅम’ श्रेणीत चार, कणकवलीमध्ये ‘सॅम’ श्रेणीत पाच व ‘मॅम’ श्रेणीत ३२, देवगडमध्ये ‘सॅम’ श्रेणीत पाच व ‘मॅम’ श्रेणीत आठ, मालवणमध्ये ‘सॅम’ श्रेणीत सहा व ‘मॅम’ श्रेणीत ३७, कुडाळमध्ये ‘सॅम’ श्रेणीत सात, तर ‘मॅम’ श्रेणीत ९१, वेंगुर्लेत ‘सॅम’ श्रेणीत तीन, तर ‘मॅम’ श्रेणीत ३७, सावंतवाडीमध्ये ‘सॅम’ श्रेणीत चार, तर ‘मॅम’ श्रेणीत ७० आणि दोडामार्ग तालुक्यात ‘सॅम’ श्रेणीत दोन तर ‘मॅम’ श्रेणीत २१ बालके आहेत. या ३५८ मुलांचे श्रेणी संवर्धन करण्यासाठी महिला व बालविकास आणि आरोग्य विभागच्या मदतीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती बुधवारी महिला व बालविकास समिती सभेत देण्यात आली.१७ मुलांच्या श्रेणीत सुधारणा : डॉ. साळेजिल्ह्यातील कुपोषित मुलांच्या वय, वजन, उंचीनुसार त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. या मुलांचे श्रेणी संवर्धन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रात संबंधित मुलांना आणून त्यांना योग्य तो पोषण आहार देऊन त्यांचे श्रेणी संवर्धन केले जात आहे. या केंद्रात दाखल झालेल्या १७ मुलांच्या श्रेणीत सुधारणा होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सभेत दिली. तसेच या केंद्रातून घरी गेल्यानंतर मातांनी मुलांना कोणता आणि कसा आहार द्यावा, याबाबत मार्गदर्शनही केले जात असल्याचे डॉ. साळे यांनी स्पष्ट केले.