शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

अवैध उत्खननप्रकरणी ३४ लाखांची दंड वसुली

By admin | Updated: July 9, 2015 23:49 IST

धडक कारवाई : उपविभागात चिपळूण तहसील कार्यालयात मंडणगड अव्वल

रत्नागिरी : गौण खनिजांच्या अवैध उत्खननप्रकरणी जिल्ह्यात एप्रिल ते जून २०१५ या तीन महिन्यात धडक कारवाई करून ३४ लाख ७ हजार १६८ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. पाच उपविभागात चिपळूण (२ लाख ७८ हजार) अव्वल असून, तहसीलमध्ये मंडणगड (९ लाख ३३ हजार ९८५) अव्वल आहे.वाळू, चिरा, दगड, माती आदी गौण खनिजांच्या उत्खननावर गेली दीड वर्षे बंदी होती. त्यामुळे गौण खनिजांचा लिलाव राज्यभर थांबले होता. याचा फटका जिल्ह्यालाही बसत होता. खासगीबरोबरच सर्व शासकीय बांधकामेही मोठ्या प्रमाणावर रखडली होती. त्यामुळे बंदी उठण्याची मागणी होत होती.बंदी कालावधीत जिल्ह्यात एकूण १३१ प्रकरणांवर झालेल्या या कारवाईत सर्व तालुक्यांमधून एकूण वाळू, जांभा दगड आदी गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीवरील कारवाईपोटी गेल्या तीन महिन्यात ३४ लाख ७ हजार १६८ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. चिपळूण उपविभागाने यापैकी २ लाख ७८ हजाराच्या महसुलाची भर जिल्ह्याच्या तिजोरीत टाकली आहे. त्याखालोखाल खेडने २ लाख ३० हजार आणि रत्नागिरीने २ लाख २४ हजार रूपयांच्या दंडाची वसुली केली आहे.मंडणगड तहसील कार्यालयानेही दंडाच्या वसुलीत अव्वल स्थान राखले असून, या तीन महिन्याच्या कालावधीत ९ लाख ३३ हजार ९८५ रूपयांचा दंड वसूल केला आहे. त्याखालोखाल चिपळूण तहसील कार्यालयाने ७ लाख ३८ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. इतर कार्यालयांकडून दोन लाखांपर्यंत दंड वसुली झाली आहे. गौण खनिज बंदी उठविण्यात आल्याने जिल्ह्याच्या महसुलातही वाढ झाली आहे. गतवर्षी खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील गौण खनिज उत्खननाच्या वसुलीपोटी २२ कोटी ७७ लाख २७ हजार ३३ इतका महसूल मिळवत इष्टांकापेक्षा अधिक वसुली केली होती. सर्वाधिक वसुली रत्नागिरी उपविभागाने २,६५,९८,८७८ (१७७ टक्के) केली होती, तर तहसीलस्तरावर खेडने १,५०,४३,५५८ (१५० टक्के) वसुली केली होती. जिल्ह्यात एप्रिल ते जून महिन्यात गौण खनिज अवैध उत्खननप्रकरणी जिल्ह्यात करण्यात आलेली कारवाई महत्वपूर्ण मानली जात आहे. वाळऊ, चिरा, दगड, माती आजी गौण खनिजांच्या उत्खननावर गेले दीड वर्षे बंदी होती. शासकीय बांधकामेही मोठ्या प्रमाणावर रखडली होती. त्यामुळे बंदी उठविण्याची मागणी करण्यात येत होती. उपविभागात करण्यात आलेल्या कारवाई बाबत मंडणगड तालुका अव्वल असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात १३१ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)तीन महिन्यात उपविभागीय कार्यालयानी केलेली वसुलीउपविभागप्रकरणेवसुली खेड०९२३०४५३रत्नागिरी०२२४०००चिपळूण०५२७८०००दापोली००राजापूर०४१५४१००एकूण१८८८६५५३