शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

उशिरा आलेल्या मोहोरामुळे २५ टक्के आंबा झाडांवरच!

By admin | Updated: May 19, 2017 00:39 IST

उशिरा आलेल्या मोहोरामुळे२५ टक्के आंबा झाडांवरच!

मेहरून नाकाडे। लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शेवटच्या मोहोराचा आंबा वाढत्या उष्म्यामुळे तयार झाला असून, झाडावरच पिकू लागला आहे. अवकाळी पावसाचा फटका या आंब्याला बसला आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात येथून आंबापेट्या विक्रीला येत आहेत. महाराष्ट्रातून दररोज एक लाख, तर कर्नाटकमधून २५ हजार पेट्यांची आवक सुरू आहे. यावर्षी वाशी मार्केटमध्ये सहा राज्यातून हापूस विक्रीला येत आहे. आवक वाढल्यामुळे दर कोसळले असून, शेतकऱ्यांना दहा वर्षांपूर्वीचा दर आता मिळत आहे.कोकणातून आलेल्या हापूसची विक्री १०० ते २०० रूपये डझन दराने वाशी मार्केटमध्ये सुरू आहे. कर्नाटक हापूस ३० ते ३५ रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. विक्रेते किलोवर मिळणारा कर्नाटक, गुजरातसह अन्य राज्यातील आंबा रत्नागिरी, देवगड हापूस सांगून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. यावर्षी सरासरीपेक्षा अधिकतम पाऊस होऊनही आॅक्टोबरपासून थंडी सुरू झाली. जमिनीत ओलावा असताना मोहोर आला. परंतु पुनर्मोहोरामुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम झाला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोकणातून हापूस बाजारात जाऊ लागला. सुरूवातीला पेटीला २००० ते १०,००० रूपयांपर्यंत दर देण्यात आला. मात्र, नंतर तो हळूहळू खाली आला. कोकणातील हापूसबरोबरच कर्नाटकचा हापूस सुरू झाला. महाराष्ट्राबरोबर केरळ, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, गुजरात आदी सहा राज्यातून हापूस मुंबईत आला. रत्नागिरी हापूसला त्याचा चांगलाच फटका बसला. दिसायला बऱ्यापैकी सारखा असलेला परराज्यातील आंबा रत्नागिरी, देवगड हापूस म्हणून विकण्यास सुरूवात झाली. त्याचा मोठा फटका कोकणातील शेतकरी, बागायतदारांना बसला आहे.एका बाजूला बाजारपेठेत हापूसला अनेक समस्या असताना दुसऱ्या बाजूला अजूनही मोठ्या प्रमाणात आंबा झाडावरच आहे. थंडी उशिरापर्यंत पडली असल्यामुळे झाडांना पालवी येत राहिली. त्यामुळे उशिरापर्यंत मोहोर येत राहिला. उशिरा आलेला हा मोहोर अजूनही झाडावर आहे. जवळजवळ २५ टक्के पीक अजूनही झाडावर आहे. आता पाऊस पडत असल्यामुळे यातील कितीसे पीक हातात येईल याबाबत बागायतदारही साशंक आहेत. यातील बहुतांश आंबा कॅनिंगलाच टाकला जाण्याची शक्यता आहे.