शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

दंडामुळे २२ कोटींची वसुली

By admin | Updated: April 17, 2015 00:04 IST

खनिकर्मची कामगिरी : सर्वांत अधिक वसुली रत्नागिरी विभागाची

रत्नागिरी : गौण खनिज बंदी उठविण्यात आल्याने जिल्ह्याच्या महसुलातही वाढ झाली आहे. खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील गौण खनिज वसुलीपोटी २२ कोटी ७७ लाख २७ हजार ३३ इतका महसूल मिळवत इष्टांकापेक्षा अधिक वसुली केली आहे. सर्वाधिक वसुली रत्नागिरी उपविभागाने (१७७ टक्के) केली आहे, तर तहसील स्तरावर खेड (१५० टक्के) अव्वल आहे. येथील जिल्हा खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील गौण खनिज उत्खननातून गतवर्षी ९ कोटी ७३ लाख २२ हजार ८२५ इतका महसूल मिळवला आहे. यावर्षी या विभागाचे ७४.८६ टक्के इतके उद्दिष्ट पूर्ण झाले. यात खेड तालुका आघाडीवर आहे.पर्यावरण मंत्रालयाने २०११ सालापासून गौण खनिजावर बंदी घातली होती. त्यामुळे सर्वत्र गौण खनिजांचे उत्खनन बंद होते. याचा परिणाम प्रशासनाच्या महसुलावरही झाला. लिलावच न झाल्याने त्यापोटी मिळणारे उत्पन्न ठप्प झाले होते. गतवर्षी केवळ ९ कोटी ७३ लाख २२ हजार ८२५ (७४ टक्के) इतकाच महसूल मिळाला होता. खनिकर्म विभागाला २० कोटींचे उद्दिष्ट कमी करून १३ कोटी इतके देण्यात आले होते. मात्र, तेही केवळ ७५ टक्केच झाले होते. या आर्थिक वर्षात जिल्हाधिकारी कार्यालयासह, पाच उपविभाग तसेच तहसील स्तरावरही उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाला सहा कोटींचे, उपविभागीय कार्यालयांना प्रत्येकी दीड कोटींचे, तर तहसील कार्यालयांना प्रत्येकी एक कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गौण खनिज वसुली, शासकीय वसुली आणि थकबाकी, चालू दंड, अर्ज फी व भूपृष्ठ भाडे आदींपोटी जिल्ह्याला २२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्च २०१५ पर्यंत केलेल्या या वसुलीत खेड तालुक्याने अव्वल स्थान राखले आहे, तर सर्वांत कमी वसुली गुहागर तालुक्यातून (४७ टक्के) झाली आहे. तसेच खेडवगळता सर्वच उपविभागानी इष्टांकापेक्षाही अधिक उद्दिष्टपूर्ती केली आहे. यात रत्नागिरी उपविभाग अव्वल असून, १७७ टक्के वसुली झाली आहे. राजापूर उपविभागाची १७५ टक्के वसुली झाली आहे. गौण खनिजावरील बंदी उठल्यानंतर मात्र, सर्वच तालुक्यांनी जोर लावलेला दिसून येत आहे. मार्च महिन्यात मोहीम राबवल्याने या एकाच महिन्यात जिल्ह्यात ३ कोटी ३१ लाख ११ हजार ३३२ रुपये इतकी वसुली झाली आहे. वाळूवरील बंदी २०११ सालापासून कायम आहे. लिलावही थांबले आहेत. या साऱ्यात खनिकर्मची कामगिरी महत्वाची आहे. (प्रतिनिधी)मार्च २०१५ अखेर केलेली वसुलीउपविभागउद्दिष्टवसुली खेडएक कोटी८६,०७,३७५रत्नागिरीदीड कोटी२,६५,९८,८७८चिपळूणदीड कोटी१,७०,३३,२०७दापोलीदीड कोटी१,६१,९०,१४८राजापूरदीड कोटी२,६३,१४,५५६तहसील स्तरमंडणगड१ कोटी७६,६९,८२७ दापोली१ कोटी६५,०९,८४३ खेड१ कोटी१,५०,४३,५५८ चिपळूण१ कोटी८९,६०,९२६ संगमेश्वर१ कोटी१,०६,२३,५९२गुहागर१ कोटी४६,८०,७०७ रत्नागिरी१ कोटी७७,६२,७२३राजापूर१ कोटी१,०८,०३,१९९ लांजा१ कोटी१,०८,२८,१२९जिल्हाधिकारी कार्यालय६ कोटी५,०१,००,५६५ एकूण२२ कोटी २,७७,२७,०३३ गौणखनिजावरील बंदी उठवण्यात आल्याने जिल्ह्यातील महसुलात वाढ झाल्याचे स्पष्ट होत असताना महसूलकडे तालुकास्तरावर खेडमध्ये १५० टक्के वसुली झाल्याचे सांगण्यात येत आहे. मार्च २०१५पर्यंत झालेल्या उद्दिष्टपूर्तीत खनिकर्म विभागाने चांगली कामगिरी केली आहे. या वसुलीपोटी मोठा महसूल उपलब्ध झाला आहे.